विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut, मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते आता हळू हळू बाहेर पडत आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की सरसकट आरक्षण दिलेले नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर राज्यात अराजकता निर्माण होईल, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मला असे वाटते आहे की या राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते.Sanjay Raut,
संजय राऊत म्हणाले की,नाशिक हे पवित्र आणि धार्मिक शहर आहे. या शहरात कुंभमेळा आयोजित केला जातो. प्रभु श्रीराम यांच्यासह कुसुमाग्रज, स्वा.सावरकर यांच्या नावाने ओळखले जाणारे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. आज नाशिकमध्ये जी अवस्था आणि परिस्थिती आहे त्याविरोधात शिवसेनेने आंदोलन केले आहे. ड्रग्ज विरोधात सर्वात मोठा मोर्चा नाशिकमध्ये आम्ही काढला होता. आज नाशिकमध्ये अराजक, नाशिक मनपामध्ये घोटाळे सुरू आहेत, लोकांना सोयी सुविधा दिल्या जात नाहीये.Sanjay Raut,
त्यावर दोघांमध्ये चर्चेची शक्यता
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे राधाकृष्णन यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार यात काय मोठी गोष्ट नाही. ते महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी कल्पना देतील. आम्ही पोलिसांना कसा दम देतो, त्यांच्यावर दबाव आणतो या विषयी अजित पवार उपराष्ट्रपती यांना माहिती देणार असतील. संवैधानिक पदावरील व्यक्तीला कसे आम्ही दमात घेतो यावर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
फडणवीसांनी विरोधकांसोबत नाशिकमध्ये फिरावे
संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये गुंडगिरी वाढली आहे. तर एमडी ड्रग्ज तरुण मुलांना सहज मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर विकासासाठी दत्तक घेतले आहे. त्यांनी विरोधी पक्षाच्या लोकांसोबत 2 दिवस फिरावे म्हणजे त्यांना परिस्थिती काय आहे ते समजेल. आम्ही अनेकदा त्यांना याबद्दल कळवले आहे. आता आम्ही मनसे-शिवसेना एकत्रित मोर्चा काढत या समस्यांकडे लक्ष जावे म्हणून काढत आहोत.
नेपाळमधील उद्रेकाकडे गांभीर्याने पाहावे
संजय राऊत म्हणाले की, राज्यकर्त्यांकडून पोलिसांवर दबाव आहे. भाजप, अजित पवार गट, शिंदे गटाने नेपाळमध्ये झालेल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. लोकांच्या संतापाचा स्फोट झाल्यावर काय होते हे आपण पाहिले आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना रस्त्यावर आणून मारले आहे. हे राज्यात आणि देशात होऊ नये. सहनशीलतेचा एक बिंदू असतो पण आता सहनशीलतेच्या टोकाने अंत गाठला आहे. पुण्यामध्येही हीच परिस्थिती आहे. आम्ही तिथेही मोर्चा काढणार आहोत, लोकं कंटाळले आहेत. लोकांनी यांना मतदान केलेले नाही, पण वोट चोरीच्या माध्यमातून ही लोक सत्तेवर आली आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. नाशिकनंतर इतर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतील असेही राऊत यांनी सांगितले आहे. आंदोलन करण्याची ताकद ही केवळ मनसे आणि शिवसेनेचीच आहे.
Sanjay Raut, Maharashtra, Anarchy, Nashik, Devendra Fadnavis, PHOTOS, VIDEOS, News
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
- Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश
- Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!
- याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!