• Download App
    Reservation for the post of Zilla Parishad President : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर !

    Reservation for the post of Zilla Parishad President : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर !

    Zilla Parishad President

    मुंबई : Reservation for the post of Zilla Parishad President : आता राज्यात बहुप्रतिक्षित अशा जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे.
    मागील खूप वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुण्याला आता मुहूर्त आला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या निवडणुका आता होणार हे निश्चित झाले आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची अंतिम प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर आता या निवडणुकीचा पुढील टप्पा असलेला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

    या जाहीर झालेल्या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर आता नवे समीकरणे बनू लागली आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणाला अनुसरून काही नवी समीकरणे उदयाला येत आहेत तर आधीच्या जुन्या समीकरणावर पाणी फिरतानाही दिसत आहे. अध्यक्षपदाच्या जाहीर झालेल्या आरक्षणामुळे काहींच्या मनसुभ्यात मिठाचा खडा पडला आहे तर काही लोकांच्या आनंदाला पारा उरलेला नाही. जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे आता इच्छुक उमेदवार जोमाने तयारीला लागण्याची शक्यता आहे.

    ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यात अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा यवतमाळ येथे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहणार आहे.



    कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण?

    ठाणे – सर्वसाधारण (महिला)

    पालघर – अनुसूचित जमाती

    रायगड – सर्वसाधारण

    रजागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

    सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

    नाशिक – सर्वसाधारण

    धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

    नंदुरबार – अनुसूचित जमाती

    जळगाव – सर्वसाधारण

    अहमदनगर – अनुसूचित जमाती (महिला)

    पुणे- सर्वसाधारण

    सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला

    सांगली – सर्वासाधारण(महिला)

    सोलापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग

    कोल्हापूर- सर्वस्वधारण (महिला)

    छज्पती संभाजीनगर- सर्वसाधारण

    जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

    बीड- अनुसूचित जाती (महिला)

    हिंगोली- अनुसूचित जाती

    नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग

    धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

    लातूर- सर्वसाधारण (महिला)

    अमरावती – सर्वसाधारण (महिला)

    अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

    परभणी – अनुसूचित जाती

    वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

    बुलढाणा- सर्वसाधारण

    यवतमाळ- सर्वसाधारण

    नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

    वर्धा – अनुसूचित जाती

    भंडारा – नागरिकोचा मागास प्रवर्ग

    गोंदिया- सर्वसाधारण (महिला)

    चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

    गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

     

    Reservation for the post of Zilla Parishad President announced!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supriya Sule : सुप्रिया सुळेंची नाव न घेता अर्थमंत्री अजित पवारांवर टीका- महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली, ‘पिक्सल डिफिसिएट’वरून घणाघात

    ZP President Reservation : महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; कुणाला कुठे लॉटरी लागेल??

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार- मराठा आरक्षणाचा GR कायदेशीरच; आमचे सरकार असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही