• Download App
    'बिगडे नवाब' म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना निलोफर मलिक खान म्हणतात, महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हा एकच आमचा अजेंडा | Replying to Amrita Fadnavis, who called nawab malik 'Bigde Nawab', Nilofar Malik Khan said, 'Progress and development of Maharashtra is our only agenda

    ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना निलोफर मलिक खान म्हणतात, महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हा एकच आमचा अजेंडा

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक मोठमोठ्या घटना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच काळामध्ये अनेक प्रकरणे टार्गेट करून त्याच भोवती दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताहेत.

    Replying to Amrita Fadnavis, who called him ‘Bigde Nawab’, Nilofar Malik Khan said, ‘Progress and development of Maharashtra is our only agenda

    क्रुझ ड्रग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याच्या प्रकरना बाबत अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठमोठे आरोप केले होते. नुकताच त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील एक आरोप केला आहे.

    या आरोपानुसार देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील ड्रग उद्योगाचे मास्टरमाइंड आहेत. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी ट्वीट करून अमृता फडणवीस यांच्यासोबत जयदीप राणासोबतचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. जयदीप राणा हा एक ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. यादरम्यान फडणवीस आणि नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

    अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या या आरोपांना उत्तर देताना एका कवितेद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. बिघडलेले नवाब मलिक प्रेस कॉन्फरन्स वर प्रेस कॉन्फरन्स घेऊन, स्वत:ची काळी कमाई आणि आपल्या जावई याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे अमृता फडणवीस यांनी लिहीले होते.


    AMRUTA FADNAVIS: बेनकाब तो नवाब भी होता है ! तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा-मला मध्ये आणू नका :अमृता फडणवीस


    त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाची जाणीवदेखील त्यांना करून देताना म्हटले होते की, मी एक सामाजिक कार्यकर्ते, बँकर आणि गायिका आहे. आणि मी माझी ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी सोडणार नाही. कारण मी खऱ्याची साथ कधीच सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला तर मी अजिबातच सोडत नाही. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय. माझ्याकडे असं काहीच नाही जे तुम्ही उघड करु शकता. आमच्याकडे ना भूखंड आहे, ना साखर कारखाने. असे काहीच नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही. असे त्यांनी म्हटले होते.

    अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान हिने उत्तर देताना म्हटले आहे की, जर आपल्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर पत्रकार परिषदांची तुम्ही काळजी का करता? जेव्हा सत्य तुमच्या बाजूला असते, तेव्हा तुम्हाला कोणतीही भीती अजिबात नसते. तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते नक्कीच उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हा एकच फक्त आमचा अजेंडा आहे. असे निलोफरने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत आपले मत मांडली आहे.

    Replying to Amrita Fadnavis, who called him ‘Bigde Nawab’, Nilofar Malik Khan said, ‘Progress and development of Maharashtra is our only agenda

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस