• Download App
    कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून महिलेवर पेट्राेल टाकून जाळण्याचा प्रयत्न; हल्लेखाेराचा मृत्यु तर महिलेची प्रकृती चिंताजनक । Remove from the work reason Telaring worker burn the teloring owner lady in Vadgaonsheri area

    कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून महिलेवर पेट्राेल टाकून तिला जिवंत जाळले

    टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारास कामावरुन काढल्याच्या कारणावरुन, त्याने एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्राेल टाकून पेटती सिगारेट तिच्या अंगावर टाकून देत तिला पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Remove from the work reason Telaring worker burn the teloring owner lady in Vadgaonsheri area


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारास कामावरुन काढल्याच्या कारणावरुन, त्याने एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्राेल टाकून पेटती सिगारेट तिच्या अंगावर टाकून देत तिला पेटवून दिल्याचा प्रकार साेमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडगावशेरी परिसरात घडला. पेटलेल्या महिलेने हल्लाखाेर कामगारास पकडून ठेवल्याने त्याचा या घटनेत मृत्यु झाला आहे तर महिला ९० . उपचार करण्यात येत आहे.

    मिलिंद गाेविंदराव नाथसागर (वय-३५,रा.वडगावशेरी,पुणे, मु.रा.परभणी) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेत बाला नाेया जॅनिंग (३२,रा.वडगावशेरी,पुणे , मु.रा.ओरिसा) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तर, नाथसागर याचा मित्र प्रशांतकुमार सुतांशकुमार देबनार (३२) हा या घटनेत जखमी झाला असून ताे सुमारे ३५ टक्के भाजला गेला आहे. याबाबत चंदननगगर पाेलीसांकडे बाला जॅनिंग या महिलेने तक्रार नाेंदवली आहे.
    बाला जॅनिंग ही महिला मुळची ओरिसा येथील रहिवासी असून ती आठ वर्षापूर्वी टेलरिंगच्या कामा निमित्ताने पुण्यात आली. वडगावशेरी परिसरात पाेलीस लाईनीत मांदळे निवास याठिकाणी तिचे ‘ए टु झेड’ हे टेलरिंगचे दुकान आहे.



    आराेपी मिलिंद नाथसागर हा तिच्याकडे कामाला हाेता परंतु ताे व्यवस्थित काम करत नसल्याने त्याला आठ दिवसांपूर्वी जॅनिंग यांनी कामावरुन काढून टाकला हाेता. त्याचा राग मनात धरुन साेमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आराेपी मिलिंद नाथसागर टेलरिंगच्या दुकानात आला व त्याने साेबत आणलेल्या डब्यातील पेट्राेल महिलेच्या अंगावरटाकले. त्यानंतर सिगारेट लायटरने पेटवून ती महिलेच्या अंगावर टाकली या घटनेत महिला भाजून गंभीर जखमी झाली. तिने मिलिंद नाथसागर यास पेटलेल्या अवस्थेत पकडून ठेवल्याने ताे ही ९० टक्के भाजून ताे गंभीररित्या जखमी झाला. त्याला साेडविण्याकरिता त्याचा माेबाईल शाॅपीत काम करणारा मित्र प्रशांतकुमार देबनार हा आला असता ताे सुध्दा ३५ टक्के भाजून जखमी झाला आहे अशी माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली आहे. याबाबत पाेलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड पुढील तपास करत आहे.

    Remove from the work reason Telaring worker burn the teloring owner lady in Vadgaonsheri area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर