अमरावती : डॉक्टरांकडूनच रेमसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झाला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह सहा जणांना अटक केली
प्रतिनिधी
अमरावती : डॉक्टरांकडूनच रेमसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झाला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह सहा जणांना अटक केली. Remdesivir in black market, 2 doctors arrested in Amravati
पोलिसांनी कंपनींचे १० रेमडेसिविर, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल असा एकूण १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसूत्रानुसार, शुभम कुमोद सोनटक्के (२४, रा. ठाकूर निवास चपराशीपुरा), शुभम शंकर किल्हेकर(२४, रा. धोबीनाला वडाळी), डॉक्टर अक्षय मधुकर राठोड (२४, रा. कार्टन नंबर ४ भातकुली रुग्णालय, पूनम भीमराव सोनोने (२६, रा. भेडगाव ता. बार्शीटाकळी जि. अकोला), अनिल गजानन पिंजरकर(३८, रा. सर्वोदय कॉलनी काँग्रेसनगर), डॉ. पवन दत्तात्र्य मालुसरे (३५, रा. कॅम्प रोड फ्रेजरपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील एक अटेडन्ट रेमडेसिविरचा काळाबाजार करून त्याची जादा दराने विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एक पोलीस कर्मचारी बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आला.
तसेच एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांचे पथक व पंचासह कॅम्प कार्नर येथून बनावट ग्राहक यांच्या मोबाईलवरून आरोपीशी संपर्क साधण्यात आला. ६०० रुपये मूळ किंमत असलेले रेमडेसिविरचा १२०० हजारांत देण्याचे ठरले. त्यानुसार ग्राहकाने व्यवहार केली असता, खात्री पटल्यांतर चढ्या दराने विक्री करणारा आरोपी कोविड रुग्णालयातील अटेन्डंट शुभम सोनटक्के व डफरीन मार्गावरील महावीर हॉस्पिटलमध्ये अटेन्डन्ट म्हणून कार्यरत असलेला शुभम किल्हेकरला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर व दोन दुचाकी पथकाने जप्त केल्या. त्यांना इंजेक्शन कुठून आणले, असे विचारले असता, ते इंनजेक्शन डॉक्टर अक्षय राठोड यांच्याकडून मिळाल्याची माहिती देण्यात आली.
त्याला पथकाने भातकुली पीएचसीतून ताब्यात घेतले. त्याच्या चारचाकी वाहनातून एक रेमडेसिविर जप्त केले. त्याच्याकडून इर्विन रुग्णालयातील स्टाफ नर्स पूनम सोनोने हिचे नाव समोर आले. ताब्यात घेऊन झडती घेतली असत एक रेमडेसिविर जप्त केले. तिला हे इंजेक्शन संजिवनी कोविड हेल्थ सेंटर येथील डॉक्टर व टेक्निशियन हे रेमडेसिविर पुरवीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लॅब असिस्टंट अनिल पिंजरकर, डॉ. पवन मालुसरे याच्याकडून पाच रेमिडेसिविर चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून जप्त करण्यात आले.
पोलिसांनी या कारवाईत विविध कंपनींची १ लाख २० हजार रुपये किमतीची १० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली आहेत.
Remdesivir in black market, 2 doctors arrested in Amravati
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू काश्मीर सरकारचा कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांना मदतीचा हात, ज्येष्ठांना पेन्शन तर बालकांना शिष्यवृत्ती
- क्वाड गटात सामील झालात तर आपले संबंध खराब होतील, चीनची बांग्लादेशाला धमकी
- गांधी परिवाराशिवाय अध्यक्षासाठी कॉँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच चर्चा
- सचिन वाझेला मुंबई पोलीस सेवेतून डच्चू देण्याखेरीज पर्याय होताच कुठे…??, अनिल देशमुख – अनिल परब जोडगोळीच्या राजकीय बळीचा अँगलही महत्त्वाचा