शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी रोज उद्घोषणा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला एक विशेष टपाल तिकीट किंवा विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात येते. भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. Release of a special cover of Shahajiraj Bhosle created by the Indian Postal Department
दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरीतिरंगा हे अभियान राबविण्यात येणार असून यावर्षीच्या अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा प्रसारित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवातही आजपासून करण्यात आली. पुढील वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Release of a special cover of Shahajiraje Bhosle created by the Indian Postal Department
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??