प्रतिनिधी
मुंबई : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या निमित्ताने एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब नाचवला. कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाच्या दिवशी तिघांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले. त्यानंतर कोल्हापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला आहे. कोल्हापूरकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. Reincarnation of Aurangzeb is Sharad Pawar Nitesh Rane’s tweet goes viral
त्याचवेळी शरद पवारांनी औरंगजेबाचे फोटो दाखविले, तर हा काय आंदोलनाचा विषय आहे का??, असा सवाल करणारे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार, असे खोचक ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात :
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.
निलेश राणे यांच्या ट्विट वरून सोशल मीडियात गदारोळ सुरू झाला असून अनेकांनी त्यांचे समर्थन करून पवारांवर शरसंधान साधले आहे, तर अनेकांनी निलेश राणे यांनाच दोषींच्या कटघरात उभे केले आहे.
कोल्हापुरात हिंदू समाजाचा कडकडीत बंद, पण पवार विचारतात, औरंगजेबाचे पोस्टर दाखविणे हा काय आंदोलनाचा विषय आहे???
शरद पवार यांनी मात्र औरंगजेबाचे पोस्टर दाखविणे हा काय आंदोलनाचा विषय आहे का??, असा सवाल करून तो विषयच डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला.
इतकेच नाही, तर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळला. त्यावर देखील औरंगजेबाचे पोस्टर दाखवल्यामुळे पुण्यात किंवा बाकीच्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर उतरणे योग्य नाही, असे वक्तव्य पवारांनी केले.
– म्हणे, लव्ह जिहादला फाजील महत्त्व नको
लव्ह जिहाद हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा राज्यात अनेक प्रश्न महत्त्वाचे आहे. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांना मीडियाने फाजील प्राधान्य देऊ नये, अशी शेरेबाजी देखील शरद पवारांनी केली. लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्राचा संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिंदू समाज संतप्त आहे. उत्तरकाशी मध्ये लव्ह जिहाद फैलाणाऱ्या दुकानदारांना हिंदू समाजाने धडा शिकवला आहे, तर महाराष्ट्रात संगमनेर मध्ये हिंदू समाजाने कालच प्रचंड मोर्चा काढला होता. तरी देखील शरद पवारांनी लव्ह जिहाद हा प्रश्न गंभीर नाही. त्याला फाजील महत्त्व देऊ नका, असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांच्या विरोधात द्वेष फैलावला जातो आहे. त्यांना संरक्षणाची गरज आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
Reincarnation of Aurangzeb is Sharad Pawar Nitesh Rane’s tweet goes viral
महत्वाच्या बातम्या
- अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयची निर्मिती, उत्तरेकडे कूच, केरळमध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनच्या ढगांना रोखले
- मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार, असे करणारे पहिले भारतीय पंतप्रधान, 2016 मध्ये पहिल्यांदा संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले
- भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट; पसमांदा मुस्लिमांना पटवण्याची मशक्कत!!
- Delhi AIIMS : हॅकर्सनी पुन्हा एकदा दिल्ली ‘एम्स’ला केले लक्ष्य! रुग्णालयानेच सायबर हल्ल्याची दिली माहिती