विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप विरोधात लढा देताना विरोधकांच्या एकजुटीत प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या, अशी सूचना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला केली आहे. पण प्रत्यक्षात सर्वेक्षणात मात्र प्रादेशिक पक्षांपेक्षा काँग्रेसची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे. Regional parties wants driver seat in opposition unity, but popularity of Congress has increased more than regional parties in Survey
बिहारची राजधानी पाटण्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एम. एल. या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला एक सूचना केली. प्रादेशिक पक्षांची वेगवेगळ्या राज्यांमधली ताकद वाढली आहे. ते पक्ष आपापल्या राज्यांमध्ये भाजपशी यशस्वी टक्कर घेत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने प्रादेशिक पक्षांनाच ड्रायव्हर सीट देऊन राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट घडवून आणावी, असे तेजस्वी यादव म्हणाले होते.
पण इंडिया टुडे आणि सी व्होटर या संस्थांनी केलेल्या “मूड ऑफ द नेशन” सर्वेक्षणात प्रादेशिक पक्षांपेक्षा काँग्रेसचीच लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे. आता निवडणुका झाल्या तर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 298, काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएला 153 आणि इतर प्रादेशिक पक्षांना 92 जागांवर विजय मिळू शकेल, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. अशा स्थितीत तेजस्वी यादव यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याने प्रादेशिक पक्षांसाठी ड्रायव्हर सीट देण्याची मागणी काँग्रेसकडे केली असली तरी काँग्रेसचे नेते ही मागणी स्वीकारतील का??, हा खरा प्रश्न आहे.
“मूड ऑफ द नेशन” हे सर्वेक्षण भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2023 मध्ये करण्यात आले होते. भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला लाभ झाल्याचे यातून दिसले. कारण ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या सर्वेक्षणा मध्ये काँग्रेस 125 जागा मिळणार असल्याचे दाखविले होते. परंतु त्यानंतरच्या सहाच महिन्यांमध्ये काँग्रेसची लोकप्रियता वाढून यूपीएला 153 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे.
काँग्रेसच्या लोकप्रियता वाढीचा आलेख जरी छोटा असला तरी तो सकारात्मकतेच्या दिशेने आहे हेच या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना काँग्रेस प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट देणार??, की लोकप्रियतेच्या बळावर आपणच ड्रायव्हर सीटवर बसून प्रादेशिक पक्षांची एकजुटीची गाडी हाकणार??, हे येत्या काळात दिसून येणार आहे. प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची ही वाढती लोकप्रियता मान्य होईल का??, हाही यातून प्रश्न तयार झाला आहे.
Regional parties wants driver seat in opposition unity, but popularity of Congress has increased more than regional parties in Survey
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
- तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी
- मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल