Thursday, 8 May 2025
  • Download App
    पन्नास दिवसांत 53 हजार कोरोना रुग्ण बरे; पुण्यात रुग्णांच्या संख्येमध्ये विक्रमी घट।Record decline in corona patients in Pune, 53,000 cured; Picture in 50 days

    पन्नास दिवसांत ५३ हजार कोरोना रुग्ण बरे; पुण्यात रुग्णांच्या संख्येमध्ये विक्रमी घट

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मागील 50 दिवसांत शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 52 हजार 847 ने कमी झाली आहे. Record decline in corona patients in Pune, 53,000 cured; Picture in 50 days

    एप्रिलमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 56 हजारावर पोचली होती. दुसऱ्या लाटेत अनेकांची तारांबळ उडाली होती. आता शहरात 3 हजार 699 सक्रीय रुग्णसंख्या आहे. त्यामुळे शहरात सध्या 8 हजाराहून अधिक बेड शिल्लक आहेत.

    पुणे शहरात 18 एप्रिल 2021 रोजी रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता. या दिवशी शहरात एकूण सक्रिय रुग्णांची 56 हजार 546 वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. पण दरम्यान राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पुण्यात कोरोनाचा आलेख घसरायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील 50 दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे.


    PMNRF : पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत


    पुण्यात 8 हजार 229 खाटा रिकाम्या

    28 एप्रिल 2021 रोजी रुग्णांची सर्वाधिक संख्या 10 हजार 398 होती. त्यानंतर ही संख्या 40 दिवसांपासून कमी होत गेली. सध्या 3 हजार 699 सक्रिय रुग्ण उरले आहेत. यातील 1 हजार 969 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 1 हजार 730 रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. त्यामुळे पुण्यात 8 हजार 229 खाटा रिकाम्या झाल्या आहेत.

    Record decline in corona patients in Pune, 53,000 cured; Picture in 50 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस