• Download App
    real political earthquake in Maharashtra by someone publicly saying कुणी जाहीरपणे सांगून

    कुणी जाहीरपणे सांगून महाराष्ट्रात खरा राजकीय भूकंप घडणार आहे का??

    Maharashtra

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन प्रचंड बहुमतानिशी भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या महिना – दीड महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या बातम्यांचे पेव फुटले. या बातम्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतून खतपाणी घातले गेले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातल्या आमदार खासदारांना भाजप महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची घाई झाली. त्यांची नावे अनेकदा बातम्यांमध्ये आली, पण ती प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतूनच घेतली गेली.real political earthquake in Maharashtra by someone publicly saying



    पण असे जाहीरपणे कोणी सांगून महाराष्ट्रात मोठे भूकंप घडले का??, हा खरा सवाल आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षांमध्ये बंड करताना जाहीरपणे कुठला गाजावाजा केला होता का??, जोपर्यंत प्रत्यक्ष निर्णय झाला नाही, तोपर्यंत भाजपच्या नेत्यांनी तरी जाहीरपणे कुठल्या बातम्या सूत्रांमार्फत तरी लीक केल्या होत्या का??, किंवा लीक होऊ दिल्या होत्या का??, या सगळ्या सवालांची उत्तरे नकारार्थी आहेत. मग हा नजीकचा इतिहास असताना महाराष्ट्रात आता सरकार स्थापन झाल्यानंतर कोणी जाहीरपणे सांगून राजकीय भूकंप होईल का??, या सवालांचे उत्तर सहज मिळण्यासारखे आहे.

    भुजबळांना भाजपमध्ये घेऊन ऍडजेस्ट करतील तरी कुठे??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ मालेगावातल्या कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना भेटले. अमित शहा यांनी काही मिनिटे भुजबळांना स्टेजवर आपल्या शेजारी बोलवून बसवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये भुजबळ अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या.

    छगन भुजबळांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अमित शहा यांची स्वागताची जी पोस्टर्स लावली होती, त्यावरून अजित पवार आणि घड्याळ चिन्ह गायब होते. त्यामुळे भुजबळांच्या राष्ट्रवादी सोडण्याला बळकटी मिळाली, पण म्हणून लगेच भुजबळांना भाजप आपल्या पक्षात घेऊन त्यांना कुठेतरी अड्जस्ट करेल, असे जरी मराठी माध्यमांना वाटले असले तरी प्रत्यक्षात तसे घडेलच याची कुणी गॅरेंटी देऊ शकत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर भुजबळांच्या भाजप प्रवेशाची सगळी शक्यताच स्पष्ट फेटाळून लावली.

    जे भुजबळांच्या बाबतीत तेच अन्य नेत्यांच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजपने महायुतीतल्या कुठल्याही नव्या एंट्रीला फिल्टर लावला आहे.

    real political earthquake in Maharashtra by someone publicly saying

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!