स्वार्थासाठी शिवसेना नावाचा केवळ वापर करून घेणाऱ्या टोळक्याला गाशा गुंडाळावा लागणार, असंही म्हणाले आहेत. Reaction of MP Shrikant Shinde on Shiv Sena MLA disqualification result
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल सुनावताना एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी यावेळी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावत दोन्ही गटातील सर्व आमदारांना पात्र ठरवले. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे.
श्रीकांत शिंदे म्हणतात, ‘गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या आमदार अपात्रतेबाबत निकाल लागला असून या निकालातून दिसून आले की लोकशाहीचा, संविधानाचा, शिवसेनेच्या पक्षाच्या मूळ घटनेचा विजय झाला. लोकशाही आणि संविधानाच्या गप्पा मारणाऱ्यांनीच पक्षाची घटना आणि पक्षांतर्गत लोकशाहीला कसे वेठीस धरले हे आता उजेडात आले असून ढोंगी मुखवटा फाटला आहे.’
याचबरोबर ‘शिवसेना पक्ष आपलाच आहे, धनुष्यबाण आपल्याच हातात आहे, आणि हा विजयही आपलाच आहे. रडगाणे गात पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्या आणि आयुष्य पणाला लावून पक्ष संघटनेसाठी खस्ता खाणाऱ्या शिवसैनिकांचे खच्चीकरण करू पाहणाऱ्या केवळ आपल्या स्वार्थासाठी शिवसेना या नावाचा केवळ वापर करून घेणाऱ्या टोळक्याला गाशा गुंडाळावा लागणार आहे.’ असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.
याशिवाय, ‘आता कुठलाही गट नाही, कुणालाही उठा म्हणावे लागणार नाही. आता फक्त शिवसेना आणि फक्त धनुष्यबाण ! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घटनेचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठेचा विजय झाला आहे.’ अशा शब्दांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Reaction of MP Shrikant Shinde on Shiv Sena MLA disqualification result
महत्वाच्या बातम्या
- मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!
- शाजापूरमध्ये अक्षत कलश यात्रेवर हल्लेखोरांची दगडफेक, परिसरात कलम 144 लागू
- खर्गे, ममता, पवारांची वक्तव्ये Off track; सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!
- भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक