• Download App
    दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन नाही, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे - रविकांत तुपकर |Ravikant Tupkar advises Thackeray government to pay attention to basic issues of farmers

    दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन नाही, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे – रविकांत तुपकर

    राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. याबाबत स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.Ravikant Tupkar advises Thackeray government to pay attention to basic issues of farmers


    प्रतिनिधी

    बुलडाणा : राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. याबाबत स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.तुपकर म्हणाले की, वाईन विकण्याचे परवाने ज्यांनी दिले त्यांना विचारा आणि नेमकं सरकारचं काय चाललं..

    या संदर्भामध्ये मला वाटते वाईन आणि दारू हा वेळा विषय आहे.. वाईनचा विषय थेट संबंध शेतकर्‍यांशी येतो. मी किराणा दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन करणार नाही. परंतु शेतकरी टिकला पाहिजे. हीसुद्धा त्या पाठीमागची आमची भूमिका आहे आणि सरकारने मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे छोटे मोठे निर्णय घेऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया स्वभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली.



    ते पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू आहे. ही वीजबिल वसुली अशाप्रकारे खपवून घेणार नसून जर अशाप्रकारे ऊस बिलातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुली होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

    उर्जामंत्र्यांनाही तुपकर यांनी सुनावले असून अशाप्रकारे वीज बिल वसुली न करता यासाठी वेगळी यंत्रणा आहे आणि ऊसाचे बिल हे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे आहेत. त्यामुळे ही वसुली थांबवा अन्यथा आम्रमक आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

    Ravikant Tupkar advises Thackeray government to pay attention to basic issues of farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल