प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे वऱ्हाड चक्क दुबईला निघाले आहे. केवळ मंत्री नसून त्यात ५४ अधिकारी देखील वारीत आहेत. rattling in the vault; Mahavikas Aghadi ministers will to leave for Dubai with 54 officers
दोन वर्षांपासून कोरोना होता. त्यात वाझे, वाझे प्रकरण, देशमुख साहेबांचे १०० कोटींचे वसुली, वसुली प्रकरण, या शिवाय २३ मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे एकापाठोपाठ उघडकीस आली. त्यामुळे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. त्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यनच ड्रग प्रकरण उघडकीस आले. आदी प्रकरणाने मंत्री आणि अधिकारी दमले आहेत. त्यांचा हा शीणवटा घालविण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याची चर्चा सुरु आहे.
उद्योग, पर्यटन, कृषी विकास एवढेच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास अशा विविध विभागांतील ५४ अधिकाऱ्यांची नावे या दौऱ्यात आहेत. सचिव व इतर वरिष्ठांचा त्यात समावेश आहे.
दुबईतील एक्स्पोसाठी हे अधिकारी व मंत्री भेट देणार असल्याचे वृत्त आहे. दुबई एक्स्पोसह विविध कारणासाठी हा दौरा सरकारी पैशांनी होणार आहे. पर्यायाने तिजोरीतील लाखो रुपये खर्ची पडणार आहेत. वस्त्रोद्याग मंत्री अस्लम शेख , कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, महिला विकास मंडळाच्या ज्योती ठाकरे आदींची नावे या दौऱ्यांच्या यादीत असल्याचे वृत्त आहे.
एक्स्पो हा उद्योगाशी संबंधित असल्याने उद्योगखात्याच्या शिष्टमंडळाकडून परवानगी मागण्यात आली आहे. पण स्वतः उद्योगमंत्री सुभाष देसाई मात्र या दौऱ्यात नाहीत.
एकीकडे एसटी कर्मचारी संप सुरु असताना मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या या दुबईवारीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्याच्या खर्चात वाढ झाली. लॉकडाऊनमुळे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे अनेक कामांना कात्री लावली आहे. एकीकडे खर्चात कपात केली जात आताना दुसरीकडे मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचा दुबई दौरा कितपत योग्य आहे, असा सवाल निर्माण होत आहे.
rattling in the vault; Mahavikas Aghadi ministers will to leave for Dubai with 54 officers
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई