प्रतिनिधी
मुंबई : हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्याचे प्रकार अलिकडे वाढत असून, त्यासाठी संबंधितांना आर्थिक रसद पुरवली जाते. शीख मुलगी असल्यास ७ लाख, पंजाबी ६ लाख, गुजराती ६ लाख, ब्राह्मण ५ लाख आणि क्षत्रिय मुलीचे धर्मांतर करण्यासाठी ४.५ लाख रुपये दिले जातात, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत केला. Ratecard of jihadists by religion and caste for conversion of Hindu girls
नितेश राणे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील महात्मा जोतीबा फुले (शाळा क्रमांक ६) शिक्षण संस्थेत इयत्ता ७ वी मध्ये शिकत असलेल्या सोनाली विजय पगारे या अल्पवयीन विद्यार्थिनीचे २०१९ मध्ये इम्रान कुरेशी याने अपहरण करून जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले. त्यानंतर निकाह करून गेल्या २ वर्षांपासून लैंगिक शोषण करत आहे.
संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी, तसेच सामाजिक संघटनांनी इम्रान कुरेशी विरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला; तसेच जाणीवपूर्वक अधिकाराचा दुरुपयोग करून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तेथील नागरिकांनी, तसेच संघटनांनी आंदोलन केल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्यापही आरोपीविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही, असे राणे यांनी निदर्शनास आणून दिले.
पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या
आरोपीवर कारवाई करण्याऐवजी पोलीस निरीक्षक यांच्याकडून पीडितेच्या कुटुंबीयांना तडीपार करण्याच्या धमक्या वारंवार मिळत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विनाविलंब सखोल चौकशी होऊन पीडिता सोनाली विजय पगारे आणि तिच्या कुटुंबियांना न्याय, तसेच संरक्षण देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. श्रीरामपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना विनाविलंब बडतर्फे करावे, अशी मागणी राणे यांनी केली.
पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन
पीडिता अल्पवयीन असताना आरोपीने 3 वर्षे सातत्याने अत्याचार केले. वारंवार तक्रारी करूनही गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाय त्यांचे आरोपीसोबत आर्थिक हितसंबंध आहेत का, हे तपासून पाहिले जाईल. यासंबंधीची विभागीय चौकशी 3 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल आणि आवश्यक असेल तर कठोर कारवाई केली जाईल.
Ratecard of jihadists by religion and caste for conversion of Hindu girls
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात मोठी वाढ!!
- भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 500 गावांचे मोदी सरकार करणार पुनर्वसन!!
- बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्यातुरुंगवासासंबंधीचा कायदा रद्द, पूर्वलक्षी प्रभावाने जप्तीची कारवाई नाही
- काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमांपूर्वी सोनिया, राहुल, प्रियांका यांचा एकत्र परदेश दौरा