विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raosaheb Danve, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असून, यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते उरणार नाहीत, असे भाकीत दानवे यांनी वर्तवले. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारची पाठराखण करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.Raosaheb Danve,
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी मी स्वतः भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही एकत्र सत्तेत असल्याने युतीधर्मापोटी त्यांना महापालिका दिली होती. जर आम्ही त्यावेळी स्वतंत्र लढलो असतो, तर आमचाच महापौर बसला असता. आता परिस्थिती बदलली आहे, या निवडणुकीनंतर कार्यकर्ते स्वतःचे राजकीय भविष्य पाहून स्वतःचा मार्ग निवडतील, असे सूचक विधान त्यांनी केले.Raosaheb Danve,
कोकाटेंनी राजीनामा देऊन एक वेगळा आदर्श ठेवला
सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हे आमच्या सरकारने सिद्ध केले आहे. कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आहे. नवाब मलिक जेलमध्ये जाऊनही पदावर चिकटून राहिले होते, मात्र कोकाटे यांनी राजीनामा देऊन एक वेगळा आदर्श ठेवला आहे. कोकाटे प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाले असले, तरी जे झाले ते नियमानुसारच झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर टीका
धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर भाष्य धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का? या प्रश्नावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील, त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या उपोषणावर त्यांनी टीकास्त्र सोडले. गेल्या 75 वर्षांत सुप्रिया सुळे कधी उपोषणाला बसल्या नव्हत्या, पण आता त्यांच्यावर अनेक वेळा उपोषण करण्याची वेळ येणार आहे, असा टोला दानवे यांनी लगावला.
Raosaheb Danve Criticizes Uddhav Thackeray Municipal Elections Last Fight Workers Leave Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi, : सरकारने म्हटले- नेहरूंशी संबंधित कागदपत्रे सोनिया गांधींकडे; संसदेत संबित पात्रा यांनी हे गायब झाल्याचा आरोप केला होता
- Valmik Karad : वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका; संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन फेटाळला; ठोस पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय
- नेहरूंना सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मान्य, पण त्यांना भारतरत्न द्यायला विरोध!!; पुरावा समोर
- माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा, पण पार्थच्या जमीन घोटाळ्यात नैतिकता टांगली खुंटीला!!