विशेष प्रतिनिधी
जालना : Raosaheb Danve राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निवडणूक निकालांवरून जोरदार निशाणा साधला. माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली, असे दानवे यावेळी म्हणाले.Raosaheb Danve
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दानवेंची खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, मी या पक्षात जनता पार्टीच्या काळापासून निष्ठेने काम करत आहे. पक्षाने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री आणि राज्याचा अध्यक्षही केले. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून किंवा शेपूट घालून मी विधानपरिषदेत गेलो नाही. मी सात वेळा जनतेतून निवडून आलो आहे. समोरून डरकाळी फोडत विधानसभेत आणि लोकसभेत जाणारा मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही.Raosaheb Danve
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
नऊ आणि सातच्या आकड्यांवरून टोला
दोन्ही पक्षांच्या निवडणूक कामगिरीवर बोट ठेवताना रावसाहेब दानवे यांनी आकडेवारीच सादर केली. मी वर्तवलेले भविष्य खरे ठरले आहे. प्रचारादरम्यान मला परिस्थिती समजत होती, म्हणूनच मी म्हणालो होतो की निवडणुकीनंतर यांचा पक्ष राहणार नाही. अखेर झाले काय? एकाचे 9 आमदार आले आणि एकाचे 7. साधी दोन अंकी संख्याही त्यांना गाठता आली नाही. मग त्यांना माझे बोलणे झोंबायचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंना ठेवले ‘वेटिंग’वर
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता दानवे यांनी सावध पवित्रा घेतला. दोन्ही भावांवर एकाच वेळी टीका करायला नको. राज साहेबांना सध्या ‘वेटिंग’वर ठेवा. उद्या ते काय बोलतात ते पाहू आणि मगच त्यांना उत्तर देऊ, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरील तोफ तूर्तास राखून ठेवली आहे.
संजय राऊतांनाही दिले प्रत्युत्तर
भोकरदनमधील भाजपच्या पराभवावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही दानवेंनी समाचार घेतला. भोकरदनचे सामाजिक समीकरण वेगळे आहे. जे लोक आमच्याकडून तुमच्याकडे गेले, त्यांनीच तुमचा सत्यनाश केला. त्यांच्या नादी लागल्यामुळेच तुमचा आकडा नऊवर आला आहे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
Raosaheb Danve Slams Thackeray Brothers Real Tiger Comment Photos VIDEOS Report
महत्वाच्या बातम्या
- K Kavitha : के. कविता यांची घोषणा- नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार; 2029ची विधानसभा निवडणूकही लढवणार
- सहा तास चर्चा करून सुद्धा सुप्रिया सुळे अपयशी; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा!!
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
- Jammu Kashmir : श्रीनगर ते जम्मू पर्यंत सुरक्षा, 80 गावांमध्ये घरोघरी तपासणी; घुसखोरी थांबवण्यासाठी काश्मीर पोलीस-सेनेचे संयुक्त अभियान