• Download App
    रामराजे नाईक निंबाळकरांची अचानक प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल|Ramraje Naik Nimbalkar's health suddenly deteriorated; Hospitalized

    रामराजे नाईक निंबाळकरांची अचानक प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

    रात्री अचानकपणे ताप वाढल्याने त्यांना पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.Ramraje Naik Nimbalkar’s health suddenly deteriorated; Hospitalized


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सोमवारी मध्यरात्री त्यांना पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.साताऱ्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीसाठी देखील रामराजे उपस्थित होते.

    प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचारासाठी दाखल केल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.आज मंगळवारी सकाळपर्यंत रामराजेंना बरे वाटू लागले असून सायंकाळपर्यंत घरी सोडतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.



    साेमवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी दाेघांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने बैठक झाली हाेती.

    जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय होईल, जागावाटप देखील करायचे आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता; परंतु रामराजे हॉस्पिटलमध्ये असल्याने या बैठकीत निर्णय होईल का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

    Ramraje Naik Nimbalkar’s health suddenly deteriorated; Hospitalized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!