• Download App
    कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी; आमदार राम शिंदे सुनावली खरी खोटी!! Ram shinde showed the mirror to rohit pawar over karjat jamkhed MIDC issue

    कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी; आमदार राम शिंदे सुनावली खरी खोटी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी, पण आमदार राम शिंदे यांनी सुनावली खरी खोटी!!, असे महाराष्ट्र विधिमंडळात घडले. Ram shinde showed the mirror to rohit pawar over karjat jamkhed MIDC issue

    कर्जत जामखेडच्या एमआयडीसीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पावसात भिजत आंदोलन केले. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांना एमआयडीसीची अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले. त्या संदर्भात बैठक लावली. पण त्या बैठकीकडे उदय सामंत फिरकले नाहीत. त्यामुळे रोहित पवार भडकले आणि त्यांनी उदय सामंत यांच्यावर कोणतेही आरोप लावण्याऐवजी विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्यानंतर आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांना खरी खोटी सुनावली.

    यातले राजकारण असे :

    उदय सामंत हे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात उद्योग मंत्री असले, तरी ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधून ते शिवसेनेत आले आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून आपले मंत्रीपद टिकवले. त्यामुळे रोहित पवार उदय सामंतांविषयी सॉफ्ट करणार बाळगत त्यांच्यावर टीका करण्यापासून बचावाच्या पवित्र्यात दिसले. त्याऐवजी त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातल्या आपले प्रतिस्पर्धी राम शिंदे यांना टार्गेट केले.



    त्यावरून राम शिंदे देखील भडकले आणि त्यांनी कर्जत जामखेड एमआयडीसीचा इतिहास बाहेर काढला. कर्जत जामखेड एमआयडीसी 1986 मध्ये स्थापन झाली. परंतु गेल्या कित्येक वर्षात अनेक सरकारांनी दुर्लक्ष करून तिथे उद्योग आणले नाहीत. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची तीन सरकारे आणि भाजपचे एक सरकार यांचा समावेश होता. शरद पवारही दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. पण त्यांनीही कर्जत जामखेडच्या एमआयडीसी कडे दुर्लक्ष केले.

    2019 मध्ये रोहित पवार तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बनले. त्यांनी राम शिंदे यांचा पराभव केला आणि त्यानंतर कर्जत जामखेडच्या एमआयडीसी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला “जाग” आली.

    दरम्यानच्या काळात रोहित पवारांच्या निकटवर्तीयांनी तिथल्या एमआयडीसीत मोक्याच्या जागा घेतल्या आणि म्हणून आत्ता रोहित पवार तिथली एमआयडीसी सुरू करायच्या फंदातत पडत आहेत. या सर्व प्रकारची चौकशी झाली पाहिजे, अशी आरोप मागणी आणि आरोप आमदार राम शिंदे यांनी केले.

    रोहित पवारांनी कर्जत जामखेड एमआयडीसीच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायऱ्यांवर भर पावसात आंदोलन केले होते. अनेकांनी त्या आंदोलनाची नौटंकी अशी संभावना केली आणि त्यानंतर आज राम शिंदे यांनी कर्जत जामखेड एमआयडीसी 1986 साली स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या सरकारांनी कसे दुर्लक्ष केले, याचा इतिहासच बाहेर काढून रोहित पवारांना खरी खोटी सुनावली.

    Ram shinde showed the mirror to rohit pawar over karjat jamkhed MIDC issue

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??

    काकांनी सल्ला ऐकला नाही, आता अजितदादांचा के. पी. पाटलांना सल्ला; 84 चे होणार आहात, आता रिटायरमेंट घ्या!!

    Devendra Fadnavis : WAVES 2025 परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार; तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टीम!!