• Download App
    भाजपचे शिवसेनेला धक्कातंत्र; तर शिवसेनेची काँग्रेसला गळ; पण संभाजीराजेंचे काय?? Rajya Sabha elections: BJP's shock to Shiv Sena; Shiv Sena's support to Congress; But what about Sambhaji Raje

    राज्यसभा निवडणूक : भाजपचे शिवसेनेला धक्कातंत्र; तर शिवसेनेची काँग्रेसला गळ; पण संभाजीराजेंचे काय??

    प्रतिनिधी

    मुंबई : सध्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांच्या निवडणुकीचा मुद्दा गाजत आहे. यात भाजपच्या रिक्त झालेल्या 3 जागा आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रत्येकी 1 जागा रिक्त झाली आहे. पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडी चौथ्या जागेवरही उमेदवार जिंकून आणू शकते, अशी स्थिती आहे. मात्र, भाजप धक्कातंत्राचा वापर करून आपली तिसरी जागा कायम राखण्याची रणनीती आखत असल्याचे सूत्रांची माहिती आहे. Rajya Sabha elections: BJP’s shock to Shiv Sena; Shiv Sena’s support to Congress; But what about Sambhaji Raje

    भाजपने आता तिसऱ्या जागेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यासाठी भाजप महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचा कोकणातील मोठा नेता भाजपच्या गळाला लागला असल्याची राजकीय सूत्रांनी दिली आहे. या नेत्याला भाजप तिसऱ्या जागेवर उमेदवारी देऊन भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत “चमत्कार” घडविण्याची अपेक्षा बाळगून आहे.



    काँग्रेसच्या मदतीने शिवसेना ३ उमेदवार देणार

    राज्यसभेत काँग्रेसच्या वाट्याला १ जागा असली तरी शिवसेना काँग्रेसच्या वाट्याची जागा घेऊन एकूण 3 जागेवर उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांचे नाव पक्के असून दुसरा उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिसऱ्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याचे घाटत असल्याचे सूत्रांकडून समजते. काँग्रेसने राज्यसभेची एक जागा शिवसेनेसाठी सोडावी आणि शिवसेना काँग्रेसला विधान परिषदेसाठी मदत करणार, अशी देवाण-घेवाण झाल्याचे समजते.

    – पक्षीय बलाबल

    सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदारांचे बळ भाजपकडे आहे.’

    Rajya Sabha elections: BJP’s shock to Shiv Sena; Shiv Sena’s support to Congress; But what about Sambhaji Raje

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट