प्रतिनिधी
मुंबई – राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती.Rajya Sabha by-elections in Maharashtra to be held unopposed; BJP candidate Sanjay Upadhyay will withdraw
मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती.
या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत निवडणूक विबनविरोध व्हावी, यासंदर्भात विनंती केली होती.
तर, विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर आज संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेतील, असं जाहीर करण्यात आलंय. आज दुपारी ते विधीमंडळात जाऊन अर्ज माघारी घेणार आहेत.
मी भाजपचा शिस्तबध्द कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिल्यानुसार मी राज्यसभा निवडणूकीतला अर्ज माघारी घेत आहे, असे संजय उपाध्याय यांनी पत्रकारांना सांगितले.
Rajya Sabha by-elections in Maharashtra to be held unopposed; BJP candidate Sanjay Upadhyay will withdraw
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान मोदी थेट पोचले विस्टा प्रोजेक्ट पाहायला; एक तास घेतला आढावा
- “भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा
- महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा
- SARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट