विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरील टाइम्स नाऊ या वाहिनीच्या चर्चेत अँकर सुशांत सिन्हाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नबाब मलिक यांना जेव्हा राजस्थानसंबंधी प्रश्न विचारला त्यावेळी नबाब मलिक चिडले आणि कॉलर माईक काढून टाकून चर्चेतून निघून गेले. काल रात्री ही चर्चा झाली होती. Rajasthan – Why don’t you go to Uttar Pradesh and protest ?, Nawab Malik got angry and removed the mic
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद बाबत नबाब मलिक यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन होते. लखीमपूरमध्ये ज्या पध्दतीने शेतकऱ्यांचा बळी घेण्यात आला त्या विरोधात महाराष्ट्र बंद होता, असे नबाब मलिक यांनी सांगितले.
या चर्चेत नवाब मलिक यांनी बंदबाबत भाष्य केले. आम्ही शेतकऱ्यांना निर्दयपणे मारण्याच्या कल्पनेच्या विरोधात उभे आहोत असे मलिक म्हणाले. यावेळी अँकर सुशांत सिन्हा याने लोकांना विरोध करू द्या. तुम्ही जबरदस्तीने दुकाने का बंद करीत आहात, असा प्रश्न विचारला त्यावर मलिक यांनी तुम्हाला असे वाटते की हे जबरदस्तीने आहे, तुम्ही निवडक रेकॉर्डिंग दाखवा आमची हरकत नाही, असे म्हटले.
पण त्याचवेळी राजस्थानमधल्या घटनांचा उल्लेख करून तिथे तुमचा पक्ष आंदोलन करेल का, हा प्रश्न सुशांत सिन्हाने विचारला. या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले की आमचा पक्ष तिथे नाही. त्यामुळे तिथे आंदोलन केले नाही. त्यावर सुशांत सिन्हाने ताबडतोब तुमचा पक्ष तर उत्तर प्रदेशातही नाही, हे नबाब मलिकांच्या लक्षात आणून दिले. या मुद्द्यावर मात्र नवाब मलिक चिडले. आंदोलन कुठे आणि कसे करायचे की नाही हे पक्ष ठरवेल… आणि आम्ही कुठे आहोत, असले छिछोर प्रश्न विचारू नका, असे म्हणत नवाब मलिक यांनी आपला कॉलर माईक काढून टाकून ते चर्चेतून निघून गेले.
Rajasthan – Why don’t you go to Uttar Pradesh and protest ?, Nawab Malik got angry and removed the mic
महत्त्वाच्या बातम्या
- ADR : शिवसेनेसह 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणगी, टीआरएसला मिळाले 130 कोटी रुपये
- Lakhimpur Kheri : प्रियांका गांधी ‘अंतिम अरदास’मध्ये होणार सहभागी, व्यासपीठावर येऊ देणार नसल्याचे बीकेयूकडून स्पष्ट
- मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे
- जम्मू-काश्मिरात २४ तासांमध्ये ३ चकमकींत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, खोऱ्यात लष्कराच्या
- कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने कंबर कसली; वीजनिर्मिती केंद्रावर रोज ५०० रेक पोचविणार