प्रतिनिधी
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे बाबासाहेबांशी राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे संबंध होते. Raj Thackeray’s emotional post on Babasaheb Purandre’s first memorial day
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात :
आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली.
छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्यांना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार?
असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
– राज ठाकरे
Raj Thackeray’s emotional post on Babasaheb Purandre’s first memorial day
महत्वाच्या बातम्या
- आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा
- सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
- देशात योग्य वेळ येताच सामान नागरी कायदा लागू; गृहमंत्री अमित शाहांचे स्पष्ट प्रतिपादन
- सक्तीच्या धर्मांतरातून राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका; सुप्रीम कोर्टाचे परखड निरीक्षण; रोखण्यासाठी काय उपाय करताय?, केंद्राला विचारणा
- ‘रोज असे लाखो विनयभंग होतात’; ‘मर्द असाल तर मैदानात येऊन लढा’; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची वक्तव्ये; मानसिकता काय दाखवते?