विशेष प्रतिनिधी
पुणे : Raj Thackeray जे जबाबदाऱ्या पार पाडत नसतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. तसेच जमत नसेल तर पद सोडा, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान गुरुवारी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज दिसले. या वेळी मनसेचे वरिष्ठ नेते तसेच शहरातील सर्व शाखा उपस्थित होते.Raj Thackeray
पदाधिकाऱ्यांना मतदार यादीची पडताळणी करण्याचे स्पष्ट काम सांगितलं होते. आज जेव्हा या मतदारयाद्यांबाबत विचारणा केली, तेव्हा एकाही पदाधिकाऱ्यांकडे याबाबत उत्तर नव्हते. इतके दिवस काय काम केले ते दाखवा, मतदार याद्या का पूर्ण केल्या नाहीत. जे पदाधिकारी काम करणार नाहीत, किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत, अशा शब्दांत ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ही बैठक एक-दोन तास चालणे आवश्यक होते. सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हे या बैठकीचे मूळ उद्देंश होता. मात्र, शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडूनच निराशाजनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणे पसंत केले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू असल्याचे दिसून आले आहे.
Raj Thackeray Warns MNS Workers Non Performance Show Work | VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- High Court, : हायकोर्टाने म्हटले- मतदान स्वातंत्र्य अन् मतदान हक्क वेगवेगळे; यादी पुनरावलोकनाच्या वेळी मतदार म्हणून नोंदणीचा हक्क
- Badrinath Dham : बद्रीनाथ धाममध्ये बर्फवृष्टी, तापमान शून्यावर; भाविकांची गर्दी, 15.90 लाख लोकांनी घेतले दर्शन
- RBI : व्याजदरात 0.50% कपातीची शक्यता; महागाई घटल्याने निर्णयाचा अंदाज, RBIची डिसेंबरमध्ये बैठक
- Kishtwar : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी