• Download App
    MNS Turns 20: Raj Thackeray Visits Raigad Fort, Vows to Restore Maharashtra’s Glory VIDEOS मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण, राज ठाकरे रायगडावर; हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात आणण्याचा संकल्प

    Raj Thackeray : मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण, राज ठाकरे रायगडावर; हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात आणण्याचा संकल्प

    Raj Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळीच रायगडावर पोहोचलेत. ते तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. हे कुटुंब सकाळी 8 च्या सुमारास रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून ते रोप वेच्या माध्यमातून गडावर पोहोचले. राज ठाकरे छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर मनसेच्या सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला सुरुवातही करणार आहेत. ही नोंदणी उद्यापासून राज्यभर सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात यावा, अशी कामना राज यांनी व्यक्त केली आहे.Raj Thackeray

    राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मागील 20 वर्षांतील आंदोलनांमुळे मराठी म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबवण्यात आपल्या पक्षाला यश आल्यावर समाधान व्यक्त केले. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा व मराठी माणूस यांच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन आमच्या पक्षाची स्थापना झाली. आज या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजेच मनसे हे लोकांच्या मनात बिंबवण्यात आम्हाला यश आले. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असे इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात. यातच आपण काय कमावले आहे याचा अंदाज येतो, असे ते आपल्या कार्यकर्त्यांना उभारी देताना म्हणालेत.Raj Thackeray



    राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी…

    राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष झाली. 20 वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण 20 वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं!

    मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल, असे ते म्हणाले.

    राज पुढे म्हणतात, गेल्या 20 वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !

    अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या 10 मार्च 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !

    त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा. तुमचं मनःपूर्वक स्वागत असेल, असे ते म्हणाले.

    MNS Turns 20: Raj Thackeray Visits Raigad Fort, Vows to Restore Maharashtra’s Glory VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Avinash Jadhav : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळा; मनसेच्या अविनाश जाधवांचा आरोप

    ‘‘पीएमपीएमएल’’ कर्मचाऱ्यांसाठी ‘‘गुड न्यूज’’; सातव्या वेतन आयोगातील थकीत रक्कम मिळणार लवकरच!!

    गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ रेणापूरच्या पंचायत समितीत भाजपच्या मदतीने मनसेच्या सभापती!!