• Download App
    Raj Thackeray Questions Election Commission PADU Machine Campaign Rules Photos VIDEOS राज ठाकरेंचा आयोगाला सवाल- पाडू मशीन का आणलं? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का?

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा आयोगाला सवाल- पाडू मशीन का आणलं? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का?

    Raj Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Raj Thackeray  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या परवानगीवर हरकत घेतली. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत ही परवानगी का मिळाली? का देण्यात आली? कायदा का बदलला? लोकसभा व विधानसभेला अशी मुभा का देण्यात आली नाही? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राज यांनी यावेळी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या ‘पाडू’ मशीनच्या वापरावरही आक्षेप घेतला आहे. आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता ही मशीन ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयोग सरकारला मदत करत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.Raj Thackeray

    मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी 5 वा. संपला. पण मुंबईतील एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची उघड मुभा सभेच्या इतिवृत्तातून दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर इतिवृत्तातील चूक दुरुस्त करण्यात आली. पण याविषयी निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी निवडणूक यायोगावर टीकेची झोड उठवली आहे.Raj Thackeray



    मतदारांना भेटण्याची परवानगी का देण्यात आली?

    राज ठाकरे आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मंगळवारी सायंकाळी 5 वा. प्रचार संपला. आजपर्यंत ज्या काही निवडणुका इतकी वर्षे पाहिल्या, त्यात निवडणुकीचा प्रचार 5 वा. संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा व त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान ही प्रथा होती. पण या सरकारला काय हवे आहे? त्यावर हा निवडणूक आयोग काम करत आहे. त्यांनी काल एक नवे नोटिफिकेशन काढून उमेदवारांना आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची मुभा दिली. ही नवीन प्रथा व नवीन पद्धत कशी काय व कुठून आली याची आम्हाला काहीही कल्पना नाही. पण ही पद्धत आजच का आली? ती विधानसभा व लोकसभेला का नव्हती? अगोदरच्या कोणत्याही निवडणुकीला का आली नाही?

    निवडणूक आयोगाने उमेदवारांना मतदारांची जाऊन भेटण्याची मुभा दिली आहे. पण पत्रके वाटण्याची परवानगी नाकारली आहे. मग कदाचित पैसे वाटू शकता, असे आयोगाला म्हणायचे असेल. मुळात ही मुभा का मिळाली, का दिली व हा कायदा बदलला का? या नव्या गोष्टी कशासाठी आणल्या जात आहेत? असा आमचा प्रश्न आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

    ‘पाडू’ मशीनवरही व्यक्त केला संशय

    राज ठाकरे यांनी यावेळी निवडणूक आयोगाने ईव्हीएमशी जोडण्यासाठी आणलेल्या ‘पाडू’ नामक नव्या मशीनवरही संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने पाडू (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) नामक नवे मशीन आणले आहे. या मशीनची माहिती कोणत्याही राजकीय पक्षांना देण्यात आली नाही. कोणत्याही राजकीय पक्षांना दाखवण्यात आले नाही. त्यानंतरही ते मशीन ईव्हीएमला जोडले जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी आयोगाला एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तु्म्ही आम्हाला हे यंत्र का दाखवले नाही? तुम्ही हे कोणते नवे यूनिट आणले? असे प्रश्न उपस्थित केलेत.

    आयोग सरकारसाठीच काम करत आहे का?

    राज म्हणाले, निवडणूक आयोगाला हे मशीन दाखवावे व सांगावेही वाटत नाही. ते त्यांना हवे ते करत आहेत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यावर उत्तर देण्यास तयार नाहीत. आत्ताच्या सरकारने हा वाघ केव्हाच मारून टाकलाय. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. पण ही कोणती प्रथा व कोणत्या गोष्टी महाराष्ट्रात चालू आहेत? हे लोकांना समजले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज हे लोक कायदे बदलत आहेत. हा काय प्रकार सुरू आहे यासंबंधी पत्रकारांनी आयोगाला प्रश्न विचारले पाहिजेत. जनतेनेही विचारले पाहिजेत. या सरकारला जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारला आता ज्या काही सुविधा हव्या आहेत त्यासाठी आयोग काम करत आहे का? हा आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

    लोक स्वतःहून सत्ताधाऱ्यांचे पैसे नाकारत आहेत

    ते पुढे म्हणाले, आमच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सतर्क राहिले पाहिजे. आपल्या विभागात व बूथमध्ये काय सुरू आहे यावर लक्ष दिले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार सध्या मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. ते कुठे पैसे वाटत आहेत ते पाहा. कारण, आता भाजप व शिंदे गटाकडून प्रत्येकी 5 हजार रुपये वाटले जात आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे लोक स्वतःहून हे पैसे नाकारत आहेत. पण या सर्व गोष्टींसाठी हरलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, हा आमचा आरोप आहे. शिवसेना व मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सतर्क राहिले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

    Raj Thackeray Questions Election Commission PADU Machine Campaign Rules Photos VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातली जनता आज विकासाचा अजेंडा चालविणार, की ठाकरे, पवारांची घराणेशाही टिकविणार??

    Khadse : 25 वर्षे भ्रष्टाचार का दडवला? तुम्हीही त्यात सामील आहात का? अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर एकनाथ खडसेंचा सवाल

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला- परप्रांतीयांना मारणे हा मराठी माणसांचा विकास नाही; मुंबईत महायुतीचा विजय निश्चित