• Download App
    Raj Thackeray Launches 'Maharashtra Next' Website; Warns PM Modi on Iran Policy VIDEOS महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाइट गुढीपाडवा मेळाव्यात लाँच; इराणची साथ सोडणे भविष्यामध्ये भारताला महागात पडणार- राज ठाकरे

    Raj Thackeray : महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाइट गुढीपाडवा मेळाव्यात लाँच; इराणची साथ सोडणे भविष्यामध्ये भारताला महागात पडणार- राज ठाकरे

    Raj Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Raj Thackeray गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा खास आहे. आजच्या मेळव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील विकासाचा बोजवारा, नोकऱ्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला धारेवर धरलेच, पण त्याचबरोबर इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही अत्यंत बोचरी टीका केली.Raj Thackeray

    “महाराष्ट्र कोलमडून पडलाय, तरुण इन्स्टाग्राममध्ये अडकलाय आणि सरकार फक्त आकडेवारीचा खेळ मांडतंय,’ असे सांगून आज इराण अडचणीत असताना आपण मौन बाळगले आहे. इराणची साथ सोडणे भविष्यात भारताला महागात पडेल, “ अशा कडक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली.Raj Thackeray



    मुंबईतील शिवतीर्थावर आयोजित मनसेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवीन वेबसाइट महाराष्ट्राला अर्पण करत, जनतेचा आवाज बनण्याचे आश्वासन दिले. तरुणांच्या मानसिकतेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला आयपीएल, सिनेमे आणि इन्स्टाग्राममध्ये गुंतवून ठेवले जात आहे, जेणेकरून तुम्ही सरकारला प्रश्न विचारणार नाही. तुम्ही असेच इन्स्टाग्राममध्ये अडकून राहिलात, तर हे सरकार तुमच्या डोक्यावर बसून राज्य करेल. आता बदलाची वेळ आली आहे.‘

    जनतेच्या संपर्कात राहण्याचा डिजिटल प्रयत्न

    पक्षाच्या पडझडीनंतर, राज ठाकरेंची ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवी खेळी म्हणजे जनतेशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्याचा ‘डिजिटल फेररचना’ प्रयोग आहे. वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे निर्माण झालेली ‘विश्वसनीयतेची दरी’ भरून काढण्यासाठी प्रयत्न आहे. मोदी-फडणवीसांवर केलेली टीका हा स्वबळावरील अस्तित्वाचा एक रणनीतिक भाग आहे.

    आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, “आज जगभरात भीषण परिस्थिती आहे. सध्या सगळीकडे धाकधूक आहे. भीषण परिस्थिती आहे. अन्न शिजवायला गॅस मिळत नाहीये. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. त्या इराणवरती जे हल्ले होत आहेत, त्यामध्ये आपण इराणला साथ द्यायला हवी होती.

    या देशामध्ये येणारे बरचसं तेल इराणहून येते. ते आपल्याला तेल रुपयात देतात. खामेनेई गेल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी कुठलेही निषेधाचे एकही निवेदन काढले नाही. हल्ल्यावरही कुठले निवेदन दिले नाही, इराणला पाठिंबा न देणे ही मोठी चूक असून, त्याचे गंभीर परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील,” अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

    शहराची अवस्था अत्यंत बकाल

    राज्यातील शहरांच्या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे यांनी प्रशासकीय अनागोंदीवर निशाणा साधला. “आज शहरांना कोणताही आकार राहिलेला नाही. कोणालाही कुठेही इमारती बांधण्याची परवानगी दिली जात आहे. शहरांची अवस्था अत्यंत बकाल झाली असून रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आवाक्याबाहेर गेला आहे,” अशी टीका त्यांनी केली.

    चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर कमी कर्ज होते

    राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतायेत विकास करायचाय. तीन ट्रीलीयनची अर्थव्यवस्था करायची आहे. पण सध्या महाराष्ट्रावर 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यावर 2 लाख कोटींचे कर्ज होते. 2014 ते 2026 या काळात हे सगळं 11 लाख कोटींचे कर्ज झाले आहे.”

    बाळासाहेबांच्या ‘त्या’ गुरुमंत्राची आठवण

    आपल्या राजकीय प्रवासाचे २० वे वर्ष साजरे करताना राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “मी ज्या वयात राजकारणात आलो, तेव्हा बाळासाहेबांनी मला एक गुरुमंत्र दिला होता. ते म्हणाले होते की, तू भाषण किती जोरात करतोस किंवा कसे करतोस यापेक्षा तू भाषणातून आज लोकांना काय दिले, हे महत्त्वाचे आहे.” त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भाषणापेक्षा कृती आणि आशयावर भर देण्याचे आवाहन केले.

    भीषण परिस्थितीचे वास्तव

    देशातील आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. “लोकांना अन्न शिजवायला गॅस मिळत नाहीये, सगळीकडे धाकधूक सुरू आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी पंतप्रधानांकडून राहून गेल्या आहेत, ज्याचा फटका देशाला बसतोय,” असेही ते म्हणाले.

    Raj Thackeray Launches ‘Maharashtra Next’ Website; Warns PM Modi on Iran Policy VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू!!

    CM Fadnavis : अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते कारवाईचे आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

    Baramati Bypolls 2026 : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस लढणारच; महाविकास आघाडीत मतभेद, बिनविरोध निवडीची शक्यता धूसर