विशेष प्रतिनिधी
मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रावरील पोलिसांची कारवाई कायद्याच्या कक्षेत आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये ६० हून अधिक व्हिडिओ सापडले आहेत आणि अजून डाटा मिळवायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.Raj Kundra didn’t get bail
कुंद्रासह रॉयन थॉर्प यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी पूर्वसूचना न देता अटक केली आहे. त्यामुळे आम्हाला दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेली कोठडी अवैध आहे, असा दावा दोघांनी याचिकेत केला होता. न्यायालयाने यावर निकालपत्र जाहीर केले.
पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई कायदेशीर बाबींनुसार केली आहे आणि महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेला पोलिस कोठडीचा निर्णयही योग्य आहे. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत जामीन नाकारला.
पोलिसांनी दोघांना अश्लील साहित्य तयार करणे, प्रसारित करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अटक केली आहे. याचिकेवर दहा ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
Raj Kundra didn’t get bail
महत्त्वाच्या बातम्या
- त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न, पायी जात असताना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न
- पतीला आयपीएसची वर्दी चढविणे महिला डीवायएसपीला पडले महागात, थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला प्रकार
- पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी घातली कांग यास्ते शिखराला गवसणी, महाराष्ट्रातील महिलांची पहिलीच यशस्वी मोहीम
- भंडारा जिल्हा झाला कोरोनामुक्त, एकही सक्रीय रुग्ण नाही
- आता रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही चेक क्लिअर होणार, आरबीआयकडून नवीन नियमावली