• Download App
    कल्याणमध्ये काही भागात पूरस्थिती ५०० नागरिकांची केली सुटका|Rain Water is the houseas of Kalyan Area; Five Hundred person's rescued, Ulhas River Overflow

    कल्याणमध्ये काही भागात पूरस्थिती ;५०० नागरिकांची केली सुटका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या ३ते ४ दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे घटना घडत आहेत. त्यातच कल्याण मधील वालाधुनी परिसरात पावसामुळे ८ ते १० फूट पाणी घरात भरले आहे.Rain Water is the houseas of Kalyan Area; Five Hundred person’s rescued, Ulhas River Overflow

    या पाण्यामुळे परिसरात राहणारे नागरिक अडकले होते. अशा ५०० हुन अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढले आहे.कल्याणच्या वालधुनी परिसरात आज पहाटे ४ च्या सुमारास नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाल्याने घरात ८ ते १० फूट पाणी भरले. कल्याणमध्ये पावसाचा जोर कमी झाला.



    परंतु समुद्राच्या भरतीमुळे नदी पात्राचे पाण्याची पात्रता कमी न झाल्याने अनेक नागरिक हे घरांमध्ये अडकले होते. अशा ५०० हून अधिक नागरिकांना कल्याणच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे.

    •  उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
    • गेल्या ३ते ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस
    • वालाधुनी ८ ते १० फूट पाणी घरात भरले
    • समुद्राच्या भरतीमुळे नदी पात्राचे पाणी वाढले
    • आपत्कालीन विभाग, अग्निशमन जवान धावले

    Rain Water is the houseas of Kalyan Area; Five Hundred person’s rescued, Ulhas River Overflow

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!