• Download App
    कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी तुडुंब प्रतिसाद, रेल्वेने सोडल्या विक्रमी गाड्या । Railway provides extra trains for kokan

    कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी तुडुंब प्रतिसाद, रेल्वेने सोडल्या विक्रमी गाड्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरून यंदा २६१ गणपती विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ५९ जादा गाड्या सोडण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली. Railway provides extra trains for kokan



    कोकणवासीयांचा गणेशोत्सव हा जिव्हाळ्याचा सण. त्यानिमित्त मुंबई, पुणे, ठाण्यातून अनेक चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कोकणची वाट धरतात. प्रवाशांचा सोयीसाठी रेल्वेकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदा रेल्वेकडून २६१ गणपती विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वे २०१, पश्चिम रेल्वे ४२ आणि कोकण रेल्वेवरून १८ गाड्या चालवण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ५९ जादा सोडण्यात आल्या आहेत.

    वाढती गर्दी लक्षात घेता काही गाड्यांमध्ये स्लीपर क्लासचे जादा डबे जोडण्यात आले आहेत. या गाड्यांसाठी विशेष तिकीट भाडे आकारले जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

    Railway provides extra trains for kokan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !