• Download App
    Rahul Narwekar Clarifies Viral Video Claims; Denies Link to Altercation त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही माझे नाव जोडू नये, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

    Rahul Narwekar : त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही माझे नाव जोडू नये, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

    Rahul Narwekar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Rahul Narwekar शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला होता. आता यावर राहुल नार्वेकरांनी ट्विट करत या प्रकरणी खुलासा केलया आहे.Rahul Narwekar

    राहुल नार्वेकरांनी ट्विट करत म्हटले की, आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो. मी परवा माझ्या शेतजमीनिवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडू नये, ही नम्र विनंती, असे आवाहन नार्वेकरांनी केले आहे.Rahul Narwekar



    काय आहे प्रकरण?

    संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक महिला आणि एक पुरुष काही कारणावरून राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत आहेत. घटनास्थळी उपस्थित काहीजण या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर महिला नार्वेकरांसोबतच्या एका व्यक्तीला मारहाण करतानाही दिसून येत आहे. पण संजय राऊत यांनी दावा केला तसा नार्वेकरांशी धक्काबुक्की झाली आहे का? हे या व्हिडिओत दिसत नाही. हा व्हिडिओ जुना आहे की ताजा? हे ही अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे हा प्रसंग नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर घडला, तो वैयक्तिक स्वरूपाचा होता की सार्वजनिक कार्यक्रमातील, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

    दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच हा व्हिडिओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा असल्याचाही दावा केला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला, असे ते म्हणालेत.

    Rahul Narwekar Clarifies Viral Video Claims; Denies Link to Altercation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले- विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही, सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड करणे यालाच आमचे प्राधान्य

    CM Fadnavis : CM देवेंद्र फडणवीसांचा सपकाळांवर हल्लाबोल- टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी! हर्षवर्धन सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी माफी मागावी

    Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांचे वादग्रस्त विधान- टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले जावेत!