• Download App
    पुण्यातल्या हिट अँड रन केसची राहुल गांधींकडून दाखल, पण पवार - सुप्रिया सुळे का गप्प??|Rahul Gandhi took the cognisance of pune hit and run case, but sharad pawar and supriya sule kept mysterious mum

    पुण्यातल्या हिट अँड रन केसची राहुल गांधींकडून दखल, पण पवार – सुप्रिया सुळे का गप्प??

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याच्या कल्याणी नगर मधल्या हिट अँड रन केसची राहुल गांधींनी दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेगवेगळ्या भारत बनवत आहेत. एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत. ते इथे दोन वेगवेगळे न्याय निर्माण करत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला. पुण्याच्या या गंभीर केसची दखल विरोधी पक्षांपैकी मुख्य काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतली परंतु शरद पवार आणि सुप्रिया सुळे मात्र यावर अद्याप गप्प असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी सवाल केले आहेत.Rahul Gandhi took the cognisance of pune hit and run case, but sharad pawar and supriya sule kept mysterious mum



    ब्रह्मा रियालिटीचा प्रोप्रायटर विशाल अग्रवाल त्याचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि हिट अँड रन केस मधला मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल यांची क्रिमिनल हिस्ट्री बाहेर आली त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले संबंध उघड्यावर आले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे आरोपीला सोडवायला पोलीस स्टेशनमध्ये का आणि कसे गेले?? यासंदर्भात विचारणा झाली.

    या गंभीर प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या बेकायदा पब वर बुलडोझर चालले.

    ब्रह्मा रियालिटीचा प्रोप्रायटर विशाल अग्रवाल आणि त्याच्या बाकीच्या साथीदारांना पुण्याच्या न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुण्यात सलग 3 दिवस अग्रवाल परिवार आणि छोटा राजन यांचे संबंध तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांचे जुने संबंध याची चर्चा राजकीय वर्तुळासह सगळीकडे रंगली पण या सर्व प्रकरणात अद्याप शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची काहीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे अग्रवाल परिवार आणि सिल्वर ओक यांचे नेमके काय कनेक्शन आहे??, असे सवाल तयार झाले त्या संदर्भातले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

    एरवी सुप्रिया सुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल समोर येऊन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कायम निशाणा साधतात, पण पुण्यात एका बड्या बापाच्या बेट्याने दारू पिऊन दोन जणांचा जीव घेतला, त्याबद्दल मात्र सुप्रिया सुळे काहीच बोलायला पुढे आल्या नाहीत. त्यामुळे पंचशील रियालिटीज, ब्रह्मा रियालिटीज, पुण्यातले वेगवेगळे इथल्या गुंतवणुकीशी कोणाचे कसे संबंध आहेत??, याविषयीचे व्हिडिओ फिरले. परंतु सुप्रिया सुळे आणि शरद पवार पुण्यातल्या या गंभीर हिट अँड रन केस बद्दल अद्याप तरी गप्प आहेत. त्यामुळे संशयाचे मळभ राष्ट्रवादी काँग्रेसवर पसरलेले आहे.

    हीट अँड रन केस मधला मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल हा इथून पुढे अभ्यासात लक्ष केंद्रित करेल वाईट संगती मध्ये राहणार नाही अशी ग्वाही त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी न्यायालयात दिली होती. परंतु, याच सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे 2007 आणि 2008 या वर्षांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना छोटा राजनशी संबंध होते. त्यांनी अजय भोसले या माजी नगरसेवकांवर हल्ला करण्याची सुपारी दिली होती. त्यावेळी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. परंतु, त्यावेळी तो दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता.

    या सगळ्या पार्श्वभूमीवर अग्रवाल परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले संबंध उघड्यावर आले. त्यामुळेच तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे काही बोलत नाहीत का??, असे सवाल आता सोशल मीडियावर केले जात आहेत.

    Rahul Gandhi took the cognisance of pune hit and run case, but sharad pawar and supriya sule kept mysterious mum

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस