विशेष प्रतिनिधी
नागपूर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरातमधील तेली जातीत झाला. त्यांनी कास्ट सेन्सेलला विरोध केला. कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे, असे उद्गार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओडिशातील सभेत काढले. राहुल गांधींचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.Rahul Gandhi said PM Modi’s caste, Ashish Deshmukh’s counterattack – an insult to the entire OBC community
देशमुख पुढे म्हणाले की, यूपीए -2 च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल काँग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे.
ते म्हणाले की, राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिकप्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात राहीली आहे. पंडित नेहरू यांनी सन 1953-54 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सिफारशींचा विरोध केला होता.
गांधी परिवाराचे ओबीसींविरोधात षडयंत्र
आशिष देशमुख म्हणाले की, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला होता. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता. डॉ. देशमुख म्हणाले की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत, कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहेत.
तेली समाजाला ओबीसीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न
आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेस तेली समाजाला ओबीसीपासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्येसुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. अनेक राज्यांत काँग्रेस ने ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचे प्रकार केलेले आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेस ने कधीही दिलेला नाही.
Rahul Gandhi said PM Modi’s caste, Ashish Deshmukh’s counterattack – an insult to the entire OBC community
महत्वाच्या बातम्या
- नरसिंह राव + वाजपेयी सरकारांचा आर्थिक सुधारणांचा वारसा पेलण्यात “युपीए” सरकार अपयशी; मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत ठपका!!
- पक्ष एक राहिला किंवा फुटला तरी डिजिटमध्ये बदल नाही; पवार काका – पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी सिंगल डिजिटमध्येच विजयी!!
- पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू, दहशतीचे वातावरण
- बॉम्बच्या धमकीमुळे चेन्नईतील अनेक शाळांमध्ये घबराट