प्रतिनिधी
पुणे : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राहुल गांधींविषयी सुरुवातीला चांगले बोलले. पण ते चांगला वक्ता नाहीत, असे सांगून अडचणीत आले.Rahul Gandhi qualified, but not a good speaker; Vijay Wadettiwar’s Homecoming!!
पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात वडेट्टीवार यांचे भाषण झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी स्वतःचे अनेक राजकीय अनुभव सांगितले, पण हे अनुभव सांगतानाच ते एका वाक्यात फसले. विजय वडेट्टीवार म्हणाले, मी आत्तापर्यंत सहा निवडणुकांमध्ये निवडून आलो. तुम्ही लोकांमध्ये मिसळले पाहिजे. लोकांना समजेल – पटेल या भाषेत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही चांगले वक्ता बनले पाहिजे. राहुल गांधी क्वालिफाईड आहेत, पण ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे त्यांचा परिणाम लोकांमध्ये होत नाही, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले.
सोशल मीडियात त्यांचे हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले. भाजपने आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांचा व्हिडिओ व्हायरल करून विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याच लाडक्या नेत्याला घरचा आहेर दिला, असा टोला हाणला. त्याच वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील वडेट्टीवार यांनी बोलताना संयम राखायला हवा होता अशी कबुली दिली.
पण वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये देखील अस्वस्थता पसरली. राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांविषयी यापूर्वी अनेकांनी शंका व्यक्त केल्या. गुलामनबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा यांच्यासारख्या जी 23 नेत्यांनी अनेकदा सोनिया गांधींना पत्र लिहून राहुल गांधींना नेते पदावरून बाजूला करून त्यांची वेगळी राजकीय व्यवस्था करावी असे सांगून पाहिले, पण काँग्रेसच्या हायकमांड वर त्याचा परिणाम झाला नाही. राहुल गांधी आजही पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणूनच सगळीकडे वावरत असतात.
या पार्श्वभूमीवर विजय,वडेट्टीवार यांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे आणि ते काँग्रेसमध्ये देखील वादग्रस्त ठरले आहे. काँग्रेस हायकमांड या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांच्या विषयी नेमका काय निर्णय घेणार??, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Rahul Gandhi qualified, but not a good speaker; Vijay Wadettiwar’s Homecoming!!
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!