विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश झाल्यानंतर देशात 7 दिवसांचा सरकारी दुखावटा आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या सेलिब्रेशन साठी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यावर गेल्याची बातमी समोर आली आहे. भाजपने या दौऱ्यावर टीका करताच काँग्रेसने त्या दौऱ्याचे समर्थन केले आहे. Rahul Gandhi on Vietnam tour
राहुल गांधी नियमितपणे वेगवेगळ्या परदेश दौऱ्यावर असण्याबाबत संपूर्ण देशावर संशय असताना राहुल गांधींचा नवा व्हिएतनाम दौरा असाच वादात सापडला आहे. भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी या दौऱ्यावर बोट ठेवून टीका केली आहे. ज्यावेळी संपूर्ण देश मनमोहन सिंग यांच्या शासकीय दुखावटयामध्ये मग्न आहे, त्यावेळी 31 डिसेंबरचे निमित्त साधून राहुल गांधी मात्र व्हिएतनाम दौऱ्यावर निघून गेले आहेत.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
काँग्रेसचे खासदार मणीअक्कम ठाकुर यांनी त्या दौऱ्याचे समर्थन केले आहे. भाजपने ड्रायव्हर्जन पॉलिटिक्स करू नये. राहुल गांधी व्यक्तिगतरित्या परदेश दौऱ्यावर गेले, तर तुमच्या पोटात का दुखते??, असा अहवाल त्यांनी भाजपला करून राहुल गांधींचे समर्थन केले.