नाशिक : काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार असेल तर, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना प्रचारासाठी घेऊन जाऊ असा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे, अशी माहिती आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. Rahul Gandhi
त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात एकदम खळबळ उडाली. एकतर काँग्रेसने बारामती विधानसभा पोट निवडणुकीत उमेदवार दिल्याने बऱ्याच वर्षांनी काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या वर्चस्ववादाविरुद्ध दंड थोपटल्याचे चित्र निर्माण झाले. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत करून बारामती वरच्या कब्जा ढिल्ला होऊ द्यायचा नाही, ही खेळी पवारांनी केली पण काँग्रेसने आकाश मोरे यांच्या रूपाने उमेदवार उतरवून त्या खेळीला छेद दिला. Rahul Gandhi
लढतीला रंग
आता काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना थेट बारामतीत आणायचा घाट घातल्याने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले. त्यातच राहुल गांधी यांच्याबरोबर प्रकाश आंबेडकर सुद्धा बारामतीत येणार असतील, तर सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे ही लढत जास्त रंगतदार होईल. Rahul Gandhi
राजीव गांधींची प्रचारसभा
बारामती मध्ये पवारांचे वर्चस्व असल्याने कुठलाच मोठा नेता प्रचार सभेसाठी त्या गावाकडे कधी फिरकला नाही. १९८५ मध्ये शरद पवार आणि शंकरराव बाजीराव पाटील यांच्यात लोकसभेची लढत झाली होती, त्यावेळी राजीव गांधींनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येऊन प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर कुठलाही मोठा नेता बारामतीत प्रचार सभेसाठी फिरकला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा बारामती येऊन प्रचारसभा घेण्याचे टाळले होते.
बिनविरोध साठी भाजपचे प्रयत्न नाहीत
पण आता जर राहुल गांधी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बारामतीत येणार असतील, तर बारामतीत येणारे राजीव गांधी नंतरचे ते काँग्रेसचे मोठे नेते ठरतील. शिवाय पवार कुटुंबाने जरी बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोर लावला असला, तरी भाजपने मात्र काँग्रेसशी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी केला नसल्याची माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिली. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे ही लढत होणार असल्याचेच स्पष्ट झाले.
Rahul Gandhi may come to Baramati for Congress campaign
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला मिळणार स्वतंत्र AI विभाग; फडणवीस सरकार स्थापन करणार नवे आयुक्तालय!!
- पार्थचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!
- महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना, भांडवली बाजारात सूचीबद्धतेचा फडणवीस सरकारचा निर्णय
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना फटकारले; तपास NIA कडे