विशेष प्रतिनिधी
नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने इस्कॉनचे वरिष्ठ संत श्रीपाद राधानाथ स्वामी महाराज यांना आरतीसाठी आज आमंत्रित केले होते. परंतु, मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात होऊ शकला नाही. तरीही राधानाथ स्वामी महाराजांनी गोदावरी रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि ध्यान केले. Radhaswami maharaj godavari poojan
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरीत महाआरती आणि संत दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी केली गेली होती. विशेष स्टेज, रांगोळी, भव्य साऊंड सिस्टम आणि लाईट यांचे मोठे आयोजन करण्यात आले होते. परंतु, मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्व स्टेज आणि सिस्टम काढावी लागली.
राधानाथ स्वामीजींनी सांगितलं, की मला गोदावरी महाआरतीचा अमृत अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी उद्या परत येईन. असे असूनही मुसळधार पावसात त्यांनी गोदा पूजन केले आणि प्रतिकात्मक आरती केली. गोदावरीचे ध्यान केले आणि मग पुढच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रस्थान केले.
Radhaswami maharaj godavari poojan
महत्वाच्या बातम्या
- Hezbollah : हिजबुल्लाहची प्रथमच युद्धविरामाची मागणी; गाझामध्ये युद्ध थांबवण्याची अटही नाही; दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैनिकांनी फडकावला झेंडा
- North Korea : दक्षिण कोरियासोबतची सीमा बंद करणार उत्तर कोरिया; किम जोंगच्या सैन्याने लँडमाइन्स, अँटी-टँक सापळे लावले
- Kolkata rape-murder case कोलकाता रेप-हत्याप्रकरणी CBIच्या आरोपपत्रात 11 पुरावे; ट्रेनी डॉक्टरने विरोध केला होता, आरोपी संजयच्या अंगावर खुणा
- Haryana : हरियाणात 2 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा; दिल्लीत घेतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट