विशेष प्रतिनिधी
सांगली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या मृत्यूला आठ नोव्हेंबर रोजी सात वर्षे झाली. त्यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी आठवणी सांगत फेसबुकवर भावनिक पोस्ट केली आहे.
स्मिता पाटील यांनी ८ नोव्हेंबर २०१४ रोजी आर. आर. पाटील घरातू निघाले, त्या वेळच्या आठवणी त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.R. R. Seven years since my father’s death, daughters emotional post
सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर कमेंट्स करून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली आहे.स्मिता पाटील यांनी म्हटले आहे की, ८ नोव्हेंबर. बरोबर ७ वर्ष झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी आजीला सांगितले होते.
३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होत. ६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव दोन- दोनदा फिरून बघितले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत.
त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबियांकडे बघून जात असत. त्या दिवशी मी व माझी बहिण सुप्रिया, आम्ही वरती आमच्या रूममध्ये होतो. तर पप्पांनी त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते.
आर. आर. पाटील यांना मृत्यू आधीच दिसला होता का? असे म्हणून स्मिता पाटील म्हणतात, आम्ही दोघी बहिणी विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली? पपांच्या डोळ्यांत का पाणी उभारले असावे? पण आम्हाला वाटले नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवटचे कुशीत घेतले असावे.
त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती आणि शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वत:च्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वत:च्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार? मृत्यु पप्पांना आधीच दिसला होता का?
R. R. Seven years since my father’s death, daughters emotional post
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल