• Download App
    मला जेलमध्ये टाकले, तर भाजपला पाडा, जरांगेंची फडणवीसांवर आगपाखड; लाडांचेही जरांगेंना तिखट प्रत्युत्तर!! Put me in jail, topple BJP, Jarangs fire on Fadnavis

    मला जेलमध्ये टाकले, तर भाजपला पाडा, जरांगेंची फडणवीसांवर आगपाखड; लाडांचेही जरांगेंना तिखट प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर नाट्य निर्मात्याने फसवणूक केल्याची केस टाकली. पुण्याच्या न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले. पण मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली. आतापर्यंत शांतपणे उत्तर देणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी जरांगे यांना तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले. Put me in jail, topple BJP, Jarangs fire on Fadnavis

    अंतर्वली सारखे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेच्या हस्ते मोसंबी ज्यूस घेऊन मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर आगपाखड केली.

    मनोज जरांगे म्हणाले :

    पुणे येथील प्रकरणात मी कोणाची फसवणूक केली नाही. तरीही मला जेलमध्ये टाकण्यात येणार आहे. दरकेर आणि देवेंद्र फडणवीस यांचे हे अभियान आहे. मला गोळ्या घालून मारण्यात येईल. मी मरण्यास तयार आहे. मी मोठा झाल्यामुळे माझ्यावर केस टाकली. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांने हे काम केले आहे. त्याचे ते नाटक आहे. परंतु मला कारागृहात पाठवले तर भाजपचे एक सीट निवडून येऊ द्यायची नाही. त्यांनी मला जेलमध्ये मारले तर तुम्ही जिवंत आहे, तो पर्यंत भाजपला निवडून येऊ देऊ नका!!

    फडणवीस भाजपला लागलेली कीड

    मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. पुण्यातील नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात दाखल खटल्यात मनोज जरांगे हजर राहिले नाहीत. त्यामुळे हे वॉरंट काढले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. भाजप पक्ष चांगला आहे. पण फडणवीस आणि दरेकर ही भाजपला लागलेली कीड आहे. त्यांच्या चांगलाच फटका भाजपला बसणार आहे. मला थोडे नीट होऊ देऊ मग मी पाहतो. दरेकर म्हणजे तमाशातील मावशी आहे. तिचा आवाज मंजुळ आहे.

    मनोज जरांगेंना प्रसाद लाडांचे आव्हान

    भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या आगपाखडीला तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आमचे बंधू मनोजदादा यांनी फडणवीस आणि दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली. त्यांनी आज सगळ्या सीमा पार केल्यात. मी मनोजदादांना सांगू इच्छितो, जर पडायचे आहे तर त्यांनीही 288 उमेदवार उभे कराच, मग आम्हीही बघू कसे पाडता!! प्रत्येकाचे रक्त लाल असते. आम्ही मराठे आहोत, त्याचे सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नको आहे. आम्ही तुमच्या सत्य परिस्थितीवर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही!!

    तुमच्याच भाषेत उत्तर देऊ : लाड

    तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला, तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल, तर तसे बोलणे योग्य नाही. कारण त्या प्रकरणाशी फडणवीसांचा काहीही संबंध नाही. फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाहीत. पण हे तुम्ही अशीच शिविगाळ सुरूच ठेवली तर आम्हालाही त्याच भाषेत बोलावे लागेल. मनोज जरांगे निजामशाहीकडे -‘मोगलाईकडे जात आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला. त्यांना महिलांचे चालणारं घर बंद करायचे आहे का?? महाविकास आघाडीचे ऐकून तुम्ही हे करताय का?? लहान भावाला जर सरकार पैसे देत असेल, 2 कोटी मराठ्यांना त्याचा फायदा होत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला आहे का??

    मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करावेत, विधिमंडळात येऊन आरक्षणासाठी आमच्या साथीने लढाई करावी. ते जी भाषा बोलत आहेत, त्यातून शरद पवार जरांगे यांच्या पाठीशी असल्याच्य वास येत असल्याची टीका लाड यांनी केली.

    Put me in jail, topple BJP, Jarangs fire on Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!