• Download App
    पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे ढोल- ताशाचे वादन थांबवले; अखेर चर्चेअंती विसर्जन Pune police stopped playing the drum-tasha ofTulshibagh Ganpati; Immersion at the end of the discussion

    पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे ढोल- ताशाचे वादन थांबवले; अखेर चर्चेअंती विसर्जन

    वृत्तसंस्था

    पुणे : मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात परवानगी नसतानाही ढोल-ताशे वाजवत असल्याने पोलिसांनी कारवाई केली. परंतु, चर्चेनंतर जप्त साहित्य परत केले असून विसर्जन शांततेत पार पडले आहे. Pune police stopped playing the drum-tasha ofTulshibagh Ganpati; Immersion at the end of the discussion

    तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये, यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. या वेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. अखेर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यावर साहित्य परत केले.


    GANPATI BAPPA 2021: लालबागच्या राजाचा प्रसाद घरपोच मिळणार ; बुकिंग आजपासून सुरु


    पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन झाले आहे. सकाळी ११ वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन ठरले. यावेळी तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलिस तिथे पोचले आणि ढोल-ताशे जप्त केलं. यानंतर थोडा गोंधळ निर्माण झाला.
    पोलिसांनी कारवाई केली नसून फक्त समज दिली असल्याचे तुळशीबाग गणपती मंडळाने म्हटलं आहे.

    आमच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. समज दिली आहे. पोलिसांनी जप्त केलेले वादन साहित्य परत केले. यानंतर शांततेत मिरवणूक काढत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. – नितीन पंडित, खजिनदार, तुळशीबाग गणेश मंडळ

    . Pune police stopped playing the drum-tasha ofTulshibagh Ganpati; Immersion at the end of the discussion

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस