विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Bus Fire पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.Pune Bus Fire
बाह्यवळण मार्गावरून सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस जात होती. नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धावत्या बसमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुुरुवात झाली. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार वेळीच आला. बसमधील वाहकाने त्वरित गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. बसमधील प्रवासी त्वरित गडबडीत बसमधून बाहेर पडल्याने गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.Pune Bus Fire
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग थोड्याच वेळात आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळाली, तसेच घटनास्थळी मोठा धूर झाला होता. बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. बसमधील तांत्रिक बिघाड किंवा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Pune Bus Fire 30 Passengers Safe on Mumbai Bengaluru Highway
महत्वाच्या बातम्या
- India China : भारत-चीनमध्ये चर्चेची 24वी फेरी; चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना जयशंकर म्हणाले, मतभेद हे वाद व्हायला नको, मोदींच्या चीन दौऱ्याची तयारी
- हवामानाचा अंदाज: आजही पावसाचा कहर? मुंबई, पुण्यासह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट; गडचिरोलीसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- आज एकाच दिवशी पुतिन यांचा मोदींना फोन कॉल; चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले!!
- Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- युक्रेनला नाटोत घेणार नाही; क्रीमियाही परत मिळणार नाही