गणेश फरताडे याने बेरोजगारीला व कर्जबाजारीला कंटाळुन नैराश्यामधुन त्याची आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हर डोस दिला. Pune: Mother kills engineer, commits suicide by strangling son; The incident shook Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.पुण्यात अभियंता मुलाने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या आईला औषधांचा ओव्हरडोस दिला आणि त्यानंतर तोंडाला प्लास्टिकची पिशवी गुंडाळून दोरीने गळा दाबून हत्या केली.यानंतर मुलाने स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
हत्या झालेल्या महीलेच नावं निर्मला मनोहर फरताडे (वय ७६) आहे. तर गणेश मनोहर फरताडे, (वय. ४२ रा. दोघेही धनकवडी )अस त्या महिलेच्या मुलाचं नाव आहे. याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) अक्षय गार्डन सोसायटी धनकवडी येथे उघडकीस आली आहे. याबाबत शोनीत तानाजी सावंत यांनी फिर्याद दिली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गणेश फरताडे याने बेरोजगारीला व कर्जबाजारीला कंटाळुन नैराश्यामधुन त्याची आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हर डोस दिला. त्यानंतर चेह-यावर प्लॅस्टीकची पिशवी गुंडाळून दोरीने गळा आवळून हत्या केली. यानंतर गणेशने स्वतः देखील राहत्या घराच्या छताच्या लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली.