• Download App
    Woman Lawyer Assaulted in Running Car at Pune's Koregaon Park पुण्यात रात्री धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार; कोरेगाव पार्कमधील घटना; पार्टीत भेटलेल्या व्यक्तीचे कृत्य

    Koregaon Park : पुण्यात रात्री धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार; कोरेगाव पार्कमधील घटना; पार्टीत भेटलेल्या व्यक्तीचे कृत्य

    Koregaon Park

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Koregaon Park विद्येचे माहेरघर आणि महिलांसाठी सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरात धावत्या कारमध्ये एका महिला वकिलावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.Koregaon Park

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील मध्यरात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. तिथे तिची ओळख एका अनोळखी तरुणाशी झाली. संवादातून त्याने तिचा विश्वास संपादन केला. पार्टी संपल्यानंतर रात्री उशिरा घरी जाण्यासाठी ती निघाली असताना, आरोपीने “मी तुला घरी सुरक्षित सोडतो,” असे सांगून तिला कारमध्ये बसवले. मात्र, मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावरून गाडी जात असताना या नराधमाने धावत्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार केले. पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.Koregaon Park



    उच्चभ्रू वस्तीत पोलिसांची रात्रगस्त रामभरोसे, महिला सुरक्षा धोक्यात

    कोरेगाव पार्क आणि मुंढवा हा भाग आयटी हब आणि शहरातील सर्वात उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स आणि पबमध्ये वर्दळ असते. मात्र, याच रस्त्यांवर मध्यरात्री धावत्या कारमध्ये असा प्रकार घडल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याचे सखोल ज्ञान असणाऱ्या एका वकिलावर जर असा प्रसंग ओढवत असेल, तर सामान्य नोकरदार किंवा विद्यार्थी महिलांच्या सुरक्षिततेचे काय, हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

    Woman Lawyer Assaulted in Running Car at Pune’s Koregaon Park

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!