• Download App
    पुणे : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ; शालेय साहित्य खरेदीसाठी थेट बॅंक खात्यावर पैसे येणारPune: Good news for Municipal School students; Money will come directly to the bank account for the purchase of school supplies

    पुणे : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ; शालेय साहित्य खरेदीसाठी थेट बॅंक खात्यावर पैसे येणार

    सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते.Pune: Good news for Municipal School students; Money will come directly to the bank account for the purchase of school supplies


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना’डीबीटी’ योजनेतून त्यांच्या शालेय साहित्य खरेदीसाठी त्यांच्या बॅंक खात्यावर पैसे दिले जाणार आहेत. यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे.सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते.

    या साहित्याचे किमान दरपत्रक ठरवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सर्व शालेय साहित्यांच्या किमान दरांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.



    विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे पैसे दिले जाणार

    महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, विद्या निकेतन, क्रीडा निकेतन शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तरे, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, ट्रॅक सूट, बूट, स्वेटर असे साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाते.

    करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय साहित्यासाठी आवश्‍यक असणारा निधी पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हता.

    Pune: Good news for Municipal School students; Money will come directly to the bank account for the purchase of school supplies

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!