विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात सार्वजनिक गणपती उत्सवाचा आनंद, उत्साह सर्वत्र दिसत आहे . काल मानाच्या पाच गणपती सोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणपतीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .
ढोल ताशांच्या नादात पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.PUNE GANPTI Festival News
आज म्हणजेच ऋषिपंचमीच्या दिवशी गेल्या अनेक वर्षाच्या प्रथेप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज 35 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं आहे.ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 35 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.महिलांनी पहाटेपासून गणरायाच्या नामाचा जयघोष सुरू केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न झाल्याचे दिसून आले. गेल्या ३५ वर्षांपासून अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम होतो आहे. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे हे 36 वे वर्ष आहे. पारंपारिक वेशात हजारो महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.(Latest Marathi News)अथर्वशीर्ष पठणच्या कार्यक्रमाला रशियन नागरिकांच्या एका गटाला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 35 हजार महिलांचा यामध्ये समावेश होता.
PUNE GANPTI Festival News
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे भारताची आगेकूच; दुसरीकडे चीन आणि काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??
- आज ‘हे’ नेते सभागृहाला संबोधित करतील, विधेयकावर होणार सात तास चर्चा आणि मग…
- पाकिस्तानची मिस युनिव्हर्स एरिकाची ISI करणार चौकशी; काळजीवाहू PM म्हणाले- सौंदर्य स्पर्धा बाद; धार्मिक नेत्यांचाही विरोध
- हायकोर्टाचे निर्देश- सरकारने सोशल मीडिया वापराचे वय ठरवावे; मुलांना याचे व्यसन, इंटरनेटवरून मेंदू भ्रष्ट करणाऱ्या गोष्टी काढून टाका