राज्यात सन २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मध्ये पुणे सायबर पाेलीसांनी सखाेल तपास करत तीन हजार ९५५ पानी दाेषाराेपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात दाखल केले. एकूण १५ आराेपीं विराेधात सदर दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले आहे. Pune cyber police filled TET exam २०१९-२० fraud case Chargsheet in court
विशेष, प्रतिनिधी
पुणे -राज्यात सन २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मध्ये पुणे सायबर पाेलीसांनी सखाेल तपास करत तीन हजार ९५५ पानी दाेषाराेपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात दाखल केले. एकूण १५ आराेपीं विराेधात सदर दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले आहे. आराेपींनी सदर परीक्षेत सात हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पाआत्र केल्याचे दिसून आले आहे.
राज्य परीक्षा परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे(पुणे), शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खाेडवेकर (मुंबई), तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर(पुणे), जी.ए.साॅफ्टवेअर कंपनीचा संचालक डाॅ.प्रितिश देशमुख(पुणे), एजंट अंकुश हरकळ(बुलढाणा), संताेष हरकळ , अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखाेरे (सर्व रा.औरंगाबाद), सुनील घाेलप (भाेसरी,पुणे), मनाेज डाेंगरे (लातूर), सुरंजित पाटील (नाशिक), स्वप्नील पाटील (चाळीसगाव,जळगाव), राजेंद्र साेळुंके (नांदगाव,नाशिक) आणि मुकुंद सुर्यवंशी (नाशिक) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणात आणखी १२ आराेपी पाहिजे असून त्यांचा पाेलीस शाेध घेत आहे.
म्हाडा परीक्षेचा पेपर फुटणार असल्याची कुणकुण पुणे सायबर पाेलीसांना लागली हाेती. सदर गुन्हयाचा तपास करताना पाेलीसांनी डाॅ.प्रितिश देशमुख, अंकुश हरकळ व संताेष हरकळ यांना अटक केली. त्यांच्याकडे सखाेल चाैकशी करत असताना, संताेष हरकळचा जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप मध्ये टीईटी २०१९-२०च्या १२७० परीक्षार्थींची यादी मिळून अाली. त्यानुसार संबंधित परीक्षेत घाेटाळा झाल्याचे उघडकीस आले आणि पाेलीसांनी सखाेल तपास करत याप्रकरणात एकूण १५ आराेपी जेरबंद केले. तपासा दरम्यान, आराेपींनी टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल लागल्यानंतर संगनमत करुन कट रचून अार्थिक देवाणघेवाणीतून २९३ पात्र परीक्षार्थींची यादी तयार केली.
सुशील खाेडवेकर, अभिषेक सावरीकर, प्रितिश देशमुख यांनी राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपेशी संगनमताने याबाबतचा २३/३/३०२१ राेजी बनावट आदेश तयार करुन ताे महाराष्ट्रातील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला.मुख्य आराेपींनी सब एजंट मार्फेत ही पैसे गाेळा करुन पेपरफुटीचा प्रकार केल्याची कागदपत्रे पाेलीसांनी दाेषाराेपपत्रासाेबत दाखल केली आहे. आराेपींचे एकमेकांशी झालेले माेबाईल चॅटिंग, कागदपत्रे, फाेन काॅल्स याबाबतची सविस्तर माहिती दाेषाराेपपत्रात देण्यात आली आहे.
आराेपी आणि परीक्षार्थी हे एकमेकांच्या कशाप्रकारे संर्पकात हाेते याबाबतचे तांत्रिक विश्लेषणाची माहिती ही यासाेबत सादर केली गेली आहे. पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पाेलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, पाेलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटक्के यांचे मार्गदर्शनाखाली वपाेनि डी.हाके, पाेनि कुमार घाडगे यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.
साडेतीन लाख मुलांनी दिली हाेती परीक्षा
राज्यभरात २०१९ मध्ये घेण्यात अालेल्या टीईटी परीक्षेसाठी तीन लाख ४३ हजार २८४ जणांनी अर्ज भरुन परीक्षेसाठी बसले हाेते. त्यापैकी १६ हजार ७०५ जणांचा अंतिम निकाल पात्र असल्याचे प्रसिध्द करण्यात आले. मात्र, सदर निकालातील निम्मा निकाल हा आराेपींनी संगनमत करुन पैसे घेऊन अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. अशाप्रकारे तब्बल सात हजार ८८० जणांची नावे पाेलीसांच्या चाैकशीत उघड झाली असून यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव विभागातील बाेगस परीक्षार्थींचे प्रमाण माेठया प्रमाणात आहे. आतापर्यंत आराेपींच्या ताब्यातून एकूण चार काेटी ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Pune cyber police filled TET exam २०१९-२० fraud case Chargsheet in court
महत्त्वाच्या बातम्या
- हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना
- घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप
- द काश्मीर फाईल्स निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ, विवेक अग्निहोत्रींना या व्यक्तीची प्रेरणा
- केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न