• Download App
    कोरोनावरील बनावट औषधांचे पुणे कनेक्शन, विक्री प्रकरणी एकला अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। Pune connection of fake drugs on corona, arrested alone in sale case; Billions of rupees confiscated

    कोरोनावरील बनावट औषधांचे पुणे कनेक्शन, विक्री प्रकरणी एकला अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनावरील बनावट औषधाची विक्रीप्रकरणी सदाशिव पेठेतल्या औषध वितरकास अटक झाली आहे. अन्न व औषध विभागानं मोठी कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल केला. Pune connection of fake drugs on corona, arrested alone in sale case; Billions of rupees confiscated

    प्रभाकर नामदेव पाटील, असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. ते उमेद फार्मा सेल्स कंपनीचे भागीदार आहेत. यासोबतचं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर या औषध कंपनीचे संचालक सुदीप मुखर्जी याच्या विरोधातही  गुन्हा दाखल झाला आहे. मॅक्सरिलीफ हेल्थकेअर ही कंपनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथील आहे. तेथे बनावट औषधे तयार केली आहेत. कंपनीकडे औषधे निर्मिती करण्याचा परवाना नसल्याचे तपासात उघड झाले.
    फॅविपिराविर आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधांचं नाव वापरून बनावट औषध निर्मिती केली जात होती.



    अलीकडेच पोलिसांनी मुंबईतून 1 कोटी 54 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. त्याचबरोबर सुदीपकुमार मुखर्जी यालाही अटक झाली आहे. मुंबईच्या अन्न आणि औषध प्रशासनान चौकशी केली. तेव्हा मॅक्सरिलीफ हेल्थकेअरकडे औषध निर्मितीचा परवाना नसल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी विना परवाना पाच औषधांची निर्मिती करत होती. अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.

    Pune connection of fake drugs on corona, arrested alone in sale case; Billions of rupees confiscated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा