वृत्तसंस्था
पुणे : संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (१ जुलै) बंद राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. Pune City water supply closed on Thursday (1 july); Decision taken for maintenance repair
गुरुवारी (ता. १ जुलै) पर्वती जलकेंद्र पंपिंग रॉ बॉटर पंपिंग तसेच वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. पंपिंग, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत येथील पंपिंग विद्युत / पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा (गुरुवारी) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी काढले आहे.
Pune City water supply closed on Thursday (1 july); Decision taken for maintenance repair
महत्त्वाच्या बातम्या