विशेष प्रतिनिधी
पुणे : Clash in Pune काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.Clash in Pune
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवील आहे. या प्रकरणी पुण्यात त्यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विधानाविरोधात येथील काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यांनी जवळपास दीड तास आंदोलन केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.Clash in Pune
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अचानक दगडफेक झाली. त्यात एक महिला व पुरुष कार्यकर्ता जखमी झाला. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. हे चित्र पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे एकच धावपळ उडाली. या राड्यात घटनास्थळी उभ्या असणाऱ्या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तसेच महिला पोलिसाही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला.
दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने काँग्रेस भवनावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. या बंदोबस्तातच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. पण पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना अभय दिले. या घटनेत काही कारच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच काँग्रेसची एक महिला कार्यकर्ती व कार्यकर्ताही जखमी झाला आहे. यावेळी काही पोलिसांनाही दगड लागलेत, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे.
काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करताना म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले. भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे आपण एक शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री फडणवीस?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूल चालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, ते कुठल्या शाळेत शिकलेत? असा बोचरा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Clash in Pune: Stone Pelting During BJP-Congress Protests Over Tipu Row
महत्वाच्या बातम्या
- टिपू सुलतानची तरफदारी करून हर्षवर्धन सपकाळांनी मोदींच्या वक्तव्यातले सत्यच तर सिद्ध केले!!
- Nikhil Gupta : खालिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटाचे प्रकरण; भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 24 वर्षांची शिक्षा
- Trump’s : ट्रम्प म्हणाले- व्हेनेझुएलामध्ये गुप्त शस्त्राचा वापर केला; रशिया-चीनच्या संरक्षण प्रणाली निकामी झाल्या
- ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स : कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा; नागपुरात जागतिक परिषदेचे उद्घाटन