• Download App
    "पाण्याची डबकी" "समुद्र" आणि "हटाव लुंगी"...; शिवसेनेची कोणी वाजवली पुंगी...?? । "Puddle of water" "sea" and "removal skirt" ...; Who played Shiv Sena's Pungi ... ??

    “पाण्याची डबकी” “समुद्र” आणि “हटाव लुंगी”…; शिवसेनेची कोणी वाजवली पुंगी…??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा मुंबई दौऱ्याचे लळित आजही गाजते आहे. त्यांनी आपल्या मुंबई दौर्‍यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन कथित स्वरूपात तिसऱ्या आघाडीची सुरुवात केली. त्यावर सर्व राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अतिशय खोचक ट्विट करून प्रादेशिक पक्षांच्या तिसऱ्या आघाडीला आघाडीच्या कल्पनेला सुरुंग लावला आहे. “Puddle of water” “sea” and “removal skirt” …; Who played Shiv Sena’s Pungi … ??

    सारख्या पाण्याची डबकी एकत्र येऊन त्याचा समुद्र बनत नाही, असा टोला नारायण राणे यांनी प्रादेशिक पक्षांना लगावला आहे. त्याच वेळी त्यांनी आज तेलंगणा – महाराष्ट्र भाऊ-भाऊ असल्याची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही खोचक शब्दात सुनावले आहे. शिवसेनेने एके काळी “हटाव लुंगी बजाव पुंगी”, अशी घोषणा दिली होती आणि आज तेलंगण – महाराष्ट्र भाऊ भाऊ अशी घोषणा ते देत आहेत. काय अजब परिवर्तन!!, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना हाणला आहे.



    – फडणवीसांची टोलेबाजी

    तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील केसीआर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला हाणला आहे. 2019 पूर्वी या सगळ्या नेत्यांनी हातात हात घालून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. पण भाजप 2014 पेक्षा जास्त जागा मिळून लोकसभा निवडणूक जिंकून आला, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. तेलंगणमध्ये केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचे अवस्था बिकट आहे. 2019 च्या निवडणुकीत तेलंगणमध्ये भाजपचे 12 पैकी 4 खासदार निवडून आले. 2024 च्या निवडणुकीत भाजपने येथे नंबर 1 चा पक्ष असेल, असे भाकीत फडणवीस यांनी केले आहे.

    “Puddle of water” “sea” and “removal skirt” …; Who played Shiv Sena’s Pungi … ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!