विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’च्या 51 व्या अंकाचे विमोचन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. Publication if ‘Maharashtra chember patrika’
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचा एक ज्वलंत इतिहास असून महाराष्ट्रातील उद्योग वृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मोठे योगदान आहे. मराठी माणसाला उद्योग निर्मितीत प्रोत्साहन देत उद्योगवाढीसाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे काम अखंडपणे सुरू आहे.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे नवनियुक्त अध्यक्ष ललित गांधी, माजी उपाध्यक्ष समीर दूधगावकर तसेच प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.
भारतीय उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व व्यापारात अग्रेसर ठेवण्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला 95 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी, लहान-मोठे, उद्योजक व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून कार्य करीत आहे. याचे कौतुक कपूर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने कपूर यांना ‘भगवतगीता’ हा ग्रंथ भेट तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला.
Publication if ‘Maharashtra chember patrika’
महत्त्वाच्या बातम्या
- गुगलसह वेबसाइट मालकांनाही मोठा झटका, युरोपमध्ये गुगल अॅनालिटिक्सचा वापर ठरला बेकायदेशीर, वापरल्यास कोट्यवधींचा दंड
- लोकप्रियतेच्या बाबतीत पीएम मोदी पुन्हा जगात नंबर १, तब्बल ७१ टक्के लोकांनी दिली पसंती, जो बायडेन सहाव्या क्रमांकावर, 13 नेत्यांची यादी जाहीर
- यूपीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार प्रियांका गांधी, सीएम कोण होणार प्रश्नावर म्हणाल्या – दुसरा चेहरा दिसतोय?
- सलमान खान मुस्लिम, डी गॅँगचा असल्याची शेजाऱ्या ची शेरेबाजी, वकीलामार्फत सलमानचा थेट न्यायालयात आरोप, म्हणाला माझी आई हिंदू, भावांनीही हिंदू मुलींशी केलेय लग्न